गुरुग्राम जमीन घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती व व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवत प्रवर्तन संचालनालय ED ने गुरुवारी १७ जुलै २०२५ रोजी चार्जशीट दाखल केली आहे. ही चार्जशीट मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत दाखल करण्यात आली असून, यामध्ये वाड्रा, त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती व कंपन्यांवर कमी दराने जमीन खरेदी करून जास्त दराने विक्री केल्याचा आरोप आहे.
ईडीने या प्रकरणात गुन्ह्याच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेल्या अनेक मालमत्ताही जप्त केल्या आहेत. या प्रकरणाची सुरुवात २०१८ साली दाखल झालेल्या FIR वरून झाली होती.
कोण-कोण आरोपी आहेत?
सत्यनंद याजी
केवलसिंग विरक
M/s Sky Light Hospitality Pvt. Ltd.
M/s Sky Light Realty Pvt. Ltd.
M/s Onkareshwar Properties Pvt. Ltd.
जमीन घोटाळ्याची सुरुवात कशी झाली?
१ सप्टेंबर २०१८ रोजी हरियाणातील खे़डकी दौला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR क्रमांक 0288 वरून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. या एफआयआरमध्ये रॉबर्ट वाड्रा, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा, DLF कंपनी, ओंकारेश्वर प्रॉपर्टीज आणि इतरांवर IPCच्या कलम 120-B, 420, 467, 471 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
मुख्य आरोप कोणते?
Sky Light Hospitality Pvt. Ltd. ने फारच कमी भांडवलात गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात ३.५ एकर जमीन M/s ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ७.५ कोटींना खरेदी केली.
व्यवहारात चेकने पैसे दिल्याचे दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात चेक वठवला गेला नाही.
या व्यवहाराची किंमत प्रत्यक्षात १५ कोटी होती, पण अर्धीच रक्कम दाखवून अंदाजे ४५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी टाळली.
असा आरोप आहे की ही रक्कम लाच स्वरूपात वापरून, वाड्रा यांचा राजकीय प्रभाव वापरून त्या कंपनीला हाऊसिंग लायसन्स मिळवून देण्यात आला. नियम डावलून व कमी वेळात वाड्रा यांच्या कंपनीला कमर्शियल कॉलनीसाठी लायसन्स मिळवून देण्यात आले.
त्यानंतर हीच जमीन ५८ कोटींना DLF ला विकण्यात आली.
स्टॅम्प ड्युटी घोटाळा
विक्री दस्तऐवजात चुकीची माहिती देऊन, चेकच्या माध्यमातून व्यवहार दाखवण्यात आला, प्रत्यक्षात काहीच रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे खऱ्या किमतीची माहिती लपवून, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी टाळली गेली. हे IPC कलम 423 अंतर्गत गुन्हा मानला जातो.
ईडीने आरोप केला आहे की, रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा गैरवापर करून सरकारी परवानग्या मिळवल्या, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनियमितता केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध नफा कमावला. या साऱ्या प्रकरणाचे मूळ मनी लॉन्ड्रिंग व भ्रष्टाचाराशी जोडलेले असल्याचा ईडीचा दावा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.