Robert Vadra: सोनिया गांधींच्या जावईची संसदेत होणार एंट्री? राजकारणातील प्रवेशाबाबत रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक वक्तव्य

Robert Vadra Politics Entry: जेव्हा प्रियंका गांधी पहिल्यांदा संसदेत उभ्या राहून बोलतील तेव्हा मला आनंद होईल. प्रियंका वायनाडमधून निवडणूक लढवणार याचा मला आनंद असल्याच विधान रॉबर्ट वाड्रा यांनी केलंय. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर भाष्य केलं.
Robert Vadra: सोनिया गांधींच्या जावईची संसदेत होणार एंट्री? राजकारणातील प्रवेशाबाबत रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक वक्तव्य
Robert Vadra Politics EntryANI

वायनडच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात प्रियंका गांधी उतरणार आहेत. यापार्श्वभूमीवर रॉबर्ट वाड्रा यांनी एका वाहिनी दिलेल्या मुलाखतीत ते राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती रॉबर्ट वाड्रा यांनी दिली. प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत, याचा मला आनंद आहे. त्यापेक्षा त्या माझ्या आधी संसदेत रहावं असं मला वाटतं, असंही वाड्रा म्हणाले.

प्रियंका गांधी आधी निवडणूक लढवणार नव्हत्या. त्या निवडणूक लढवण्यासाठी कसं काय तयार झाल्या,असा प्रश्न पत्रकारांनी रॉबर्ट वाड्रा यांना केला. यावर रॉबर्ट वाड्रा म्हणाले की,मोठ्या प्रमाणावर असलेले हेतू आणि प्रियंका जी मेहनत करत आहेत. ही मेहनत त्या खासदार म्हणून घेतील तर देश प्रगतीच्या दिशेने जाईल. त्यांनी राजकारणात जावे, यासाठी मीही दबाव आणला होता. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून हा निर्णय घेतल्याचं रॉबर्ट वाड्रा म्हणालेत.

'प्रियंका वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याने मला खूप आनंद होत आहे. प्रियंका गांधी संसदेत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे', असं उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलं. मीही मेहनत करत राहीन आणि पुढील निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. पण माझ्या आधी प्रियंका गांधी संसदेत जाव्यात, अशी माझी इच्छा असल्याचंही वाड्रा म्हणालेत.

यावेळी रॉबर्ट वाड्रा यांनी भाजपवर टीका केली लोकसभेच्या पराभवावरुन त्यांनी वाड्रा यांनी भाजपला कोपरखळी मारली. भाजपकडून केल्या जात असलेल्या घराणेशाहीवरील टीकेवरुनही त्यांनी टोला लगावलाय. जे लोक घराणेशाहीवर बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांच्या पक्षातही एकाच कुटुंबातील अनेक लोक राजकारणात आहेत. लोकसभेच्या पराभवावर बोलताना वाड्रा म्हणाले की, भाजपने ४०० पारचा नारा दिला, पण यशस्वी होऊ शकला नाही. भाजप आयोध्येतसुद्धा पराभूत झाली. राम मंदिर बनवूनही त्याचा पराभव झाला. राम मंदिर झालं पण तेथील लोकांना रोजगार निर्माण करता आला नाहीये, अशी टीका वाड्रा म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com