रायबरेली की वायनाड? राहुल गांधींसमोरील तिढा सुटला, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार?
Rahul Gandhi and Priyanka GandhiSaam Tv

Priyanka Gandhi : रायबरेली की वायनाड? राहुल गांधींसमोरील तिढा सुटला, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार?

Priyanka Gandhi Latest News : लोकसभेत दोन जागांवर विजय मिळवल्यावर राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याची शक्यता आहे. या वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी रायबरेली आणि वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला. आता नियमानुसार राहुल गांधी यांना एक जागा सोडावी लागणार आहे. यामुळे राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडणार असल्याची चर्चा आहे. यानंतर वायनाडमधून प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ सोडावा लागणार असल्याने राहुल गांधी हे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत. मागील निवडणुकीत राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. तर वायनाडच्या जनतेने त्यांना साथ दिली होती. याचदरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, 'तुम्ही मला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम केलं. मी तुमचं प्रेम आयुष्यभर विसरू शकत नाही'.

रायबरेली की वायनाड? राहुल गांधींसमोरील तिढा सुटला, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार?
Shikhar Bank Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लिनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप; अजित पवार यांच्या अडचणी वाढणार?

राहुल गांधी यांच्या विधानामुळे ते वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे. त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीतून खासदार कायम राहतील असं बोललं जात आहे. सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघ सोडणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडणार असल्याची चर्चा आहे.

रायबरेली की वायनाड? राहुल गांधींसमोरील तिढा सुटला, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार?
Rain Hits Sikkim: सिक्कीमला मुसळधार पावसाचा फटका, जनजीवन विस्कळीत; ९ लोकांचा मृत्यू

राहुल गांधी यांनी दोनपैकी कोणत्याही एका जागेचा राजीनामा दिल्यास त्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल. त्यापैकी एका जागेवरून प्रियंका गांधी लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायबरेली बरोबर वायनाड लोकसभा मतदारसंघही गांधी कुटुंबाकडे राहील, अशी चर्चा आहे. यामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारताचं संतुलन राहील. केरळमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षानेही लोकसभेत चांगली कामगिरी केली.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी वायनाड पोटनिवडणूक जिंकल्यास संसदेत गांधी घराण्यातील तीन सदस्य होतील. यावरून भाजप घराणेशाहीवरून काँग्रेसला लक्ष्य करू शकते, असं बोललं जात आहे. तसेच दुसरीकडे निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने लोकांमध्ये इंडिया आघाडीची प्रतिमा बदलू लागल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com