Rain Hits Sikkim: सिक्कीमला मुसळधार पावसाचा फटका, जनजीवन विस्कळीत; ९ लोकांचा मृत्यू

Sikkim News: सिक्कीममध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सिक्कीमच्या काही भागाच भुस्खलन झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sikkim News
Rain Hits SikkimSaam Tv
Published On

सध्या महाराष्ट्रासह अनेक सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने सिक्कीम राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सिक्कीमध्ये अलिकडेच झालेल्या मुसळधार पावसाने भूस्खलन झाले होते. या भूस्खलनात काही व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच मृत्यांची संख्या आता ९वर गेली आहे. या घटनेत सोमवारी ३ जणांचा मृत्यू झाला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की,गुरुवार सांयकाळपर्यंत सिक्कीमध्ये आलेले सुमारे २,००० हजार पर्यटक यात अडकले होते असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

Sikkim News
National Doughnut Day: 'डोनट डे' निमित्त घरच्याघरी बनवा स्विट आणि टेस्टी डोनट्स

मिळालेल्या माहितीनुसार,सिक्कीम मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेनंतर निवेदन जारी केले होते. त्यात सिक्कीममध्ये सरकारने मदत आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा शपथविधी काही दिवसांपूर्वी पार पडला त्यावेळी मुख्यंत्री प्रेमसिंग तमांग म्हणाले की,'पिडित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत आणि तात्पुरती व्यवस्था तसेच आवश्यक असलेली मदत देण्याचा अथक प्रयत्न केले जात आहेत.

चीन (china)देशाच्या सीमेला लागून असलेल्या राज्याता सर्वात उत्तरेकडील प्रदेश मंगन जिल्ह्याला सर्वाधिक पावसामुळे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, उत्तर सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात साधारण २२० मिमी पेक्षा अधिकचा पाऊस झाला.मात्र त्याचवेळी सततच्या पावसानंतर सिक्कीममधील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.

अनेक मुख्य रस्ते खराब...

सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनामुळे अनेक संपूर्ण वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक भागातील घरांची पडझड ही झालेली आहे. दक्षिण सिक्कीमधील दमथांग तसेच पश्चिम सिक्कीममधील ग्लालशिंग आणि गंगटोक यासारख्या अनेक भागात १३ दिवसांच्या कालावधीत ३० मिमी ते ५० मिमी पर्यंत पाऊस पडला आहे. IMD नुसार, यावर्षी १३ दिवसांत तब्बल २५० मिमी पावसाची (Monsoon) नोंद झाली. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Sikkim News
One Nation, One Election: तामिळनाडू विधानसभेत 'एक राष्ट्र एक निवडणूक' धोरणाविरोधात ठराव मंजूर, स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com