Kalyan Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात

Kalyan Dombivli Rainfall Update: कल्याणसह डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
Kalyan Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात
Kalyan Dombivli RainSaam Tv

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस (Kalyan Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कल्याणमध्ये घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. कुठे नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण पाहणार आहोत...

डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दुपारपासून डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पाण्यामधूनच नागरिकांना जावे लागत आहे. या पावसामुळे दुकानदारांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे.

Kalyan Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात
Mumbai Shocking News: खळबळजनक! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळलं माणसाचं कापलेलं बोट

कल्याणमध्ये देखील दुपारपासून जोरदार पाऊस पडत आहे. कल्याणमध्ये पावसामुळे चिंचेचे भले मोठे झाड उन्मळून पडले. कल्याणच्या आधारवाडी परिसरात ही घटना घडली. घराशेजारी असलेले झाड कोसळले. झाड कोसळल्यामुळे एका शेडचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी नाही. अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे.

Kalyan Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात
Kalyan Shilphata Road: कल्याण शीळ रोडला पर्यायी रस्ते तयार करा नाहीतर मेट्रोचे काम बंद पाडू, राजू पाटील यांचा सरकारला इशारा

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात देखील दुपारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरात जवळील ग्रामीण भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय त्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. ग्रामीण भागातील शेतकरी या पावसाने सुखावले आहेत. सकाळपासून या ठिकाणी ढगांचा गडगडात आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. दुपारनंतर परिसरात जोरदार पाऊस सुरू झालाय.

Kalyan Dombivli Rain: कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी साचायला सुरूवात
Blast In Dombivli Phase 2: डोंबिवलीत अग्नीतांडवांची मालिका थांबता थांबेना, महिन्याभरात दुसरी आगीची घटना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com