ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मैदा, पिठीसाखर, दही, बेकिंग पावडर, सोडा, मीठ, बटर, तेल
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मैदा,बेकिंग सोडा, बेकिंग पावडर पिठीसाखर आणि मिठ चालून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये दही घालून थोडसं दुध टाकून छान घट्ट पिठ मळून घ्या. पिठ मळताना त्यामध्ये बटर घाला.
मळलेलं पिठ अर्धातास मलमलच्या कपड्याने रेस्टवर झाकून ठेवा. त्यानंतर त्याची जाड पोळी लाटून घ्या.
त्यानंतर डोनेट कटर किंवा वाटिच्या मदतीने लाटलेल्या पोळीचे डोनट कट करुन घ्या.
पोळीचे डोनट कट करुन झाल्यावर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. गरम तेलामध्ये डोनट खरपूस तळून घ्या.
तळलेल्या डोनेट्सवर पिठीसाखर टाका आणि सर्व्ह करा. हे डोनेट खाल्यावर घरामधील लहान मुले खुश होतील.