Manasvi Choudhary
उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
फळांपासून तयार केलेला रायता आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.
फळांचा रायता बनवण्यासाठी तुमच्या आवडीची फळे स्वच्छ कापून घ्या.
कापलेली फळे दह्यामध्ये घालून छान एकत्र करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर टाका.
हे सर्व मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थोड्यावेळाने थंडगार रायत्याचा स्वाद घ्या.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही पुदिन्याचा रायता देखील तयार करू शकता.
पुदिन्यामुळे गर्मीमध्ये पोटाला थंडावा मिळतो.
पुदिन्याचा रायता बनवण्यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून घ्या आणि त्यामध्ये काळ मीठ , थोडी साखर, जिरे घाला.