Manasvi Choudhary
आपण जे काही खातो त्याच्या आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
खाण्यापिण्याच्या सवयींकडे प्रत्येकाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
अॅसिडीटी ही समस्या लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच भेडसावत आहे.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकदा उलटी-मळमळ सारखं होतं.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते.
धणे हे अॅसिडीटी रामबाण उपाय आहे. धणे खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.
रात्री पाण्यात भिजवलेले धण्याचे पाणी सकाळी प्यायल्याने उलटी-मळमळ यासांरख्या समस्यांना आराम मिळतो.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर उलटी-मळमळ होत असेल तर लिंबूपाणी करून त्यात थोडे जिरे घाला आणि ते पाणी प्या.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या