सचिन बनसाेडे, शिर्डी
Robert Vadra visits Sai Baba Temple: कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधीं यांचे पती उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी शिर्डीत (Shirdi) साई समाधीचे दर्शन घेतले. वाड्रा हे पहिल्यांदाच साई दर्शनाला पोहचले. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. दर्शनानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. भारत जोडो यात्रेच्या प्रभावाने लवकरच देशात बदल दिसेल अंस ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. (Shirdi Latest News)
साई बाबांचे दर्शन घेऊन आनंद वाटला. इथे येऊन मला ऊर्जा मिळाली. आज मी साईबाबांचे आशीर्वाद घेतलेत पुढच्या वेळी परीवाराला घेऊन येईल. साईबाबांच्या शिकवणीप्रमाणे देशाला सर्वधर्मसमभावाची गरज आहे. कुटुंबासाठी आशीर्वाद मागितले असून भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल जे करताय त्यात त्यांना आणखी शक्ती मिळावी अशी प्रार्थना साई चरणी केल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलंय. (Latest Marathi News)
देशात बेरोजगारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधींकडून अपेक्षा असल्याने लोक त्यांच्याबरोबर जोडले जात आहेत. कोणी ट्रोल केल्याने आम्हाला फरक पडत नाही. या सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल जो बोलतो त्याला ट्रोल केलं जातं. मात्र राहुल, प्रियंका आणि आम्ही थांबणार नाही. काँगेसचे नवीन अध्यक्ष पक्षासाठी आणि देशातील जनतेसाठी चांगलं काम करतील. ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी आनंदाने जावे. मात्र जे राहतील ते सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाची मेहनत आणि त्याग समजून घेतील. (LIVE Marathi News)
देशात तोडफोडीच्या राजकारणामुळे प्रगतीला बाधा निर्माण होत आहे. गोव्याचे आठ आमदार फुटले हा राहुलजींना रोखण्यासाठी दिखावा असून यामुळे जनता खुश नाही. या सरकारने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. आवाज उठवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. अर्थव्यवस्था आणि बेरीजगारीच्या मुद्द्यांवर पक्षाच्या पलीकडे जाऊन एकत्र आले पाहिजे. मात्र सत्ताधारी ऐकायला तयार नाहीत. यंत्रणांचा चुकीचा वापर आणि त्रासामुळे उद्योगपती देश सोडून जात आहेत असा आरोप राबर्ट वाड्रा यांनी केला आहे.
मी लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. यात्रेच्या व्यवस्थापनावर माझे लक्ष असते. मात्र लोकांचा पाठिंबा बघता राहुल गांधींच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटते. सोनिया गांधींना ईडीच्या कार्यालयात बोलवण्याची गरज नव्हती. अधिकारी घरीच त्यांची चौकशी करू शकत होते. मात्र देशात चुकीच्या पध्दतीने राजकारण सुरू आहे. मी नेहमीच अन्नदान आणि दानधर्म करतो. अंध मुलांना मदत करत असल्याचे समाधान आहे. हे सरकार माझ्यावर तुटून पडलेले असताना याच मुलांकडे बघून मला आशिर्वाद आणि ऊर्जा मिळते असं राबर्ट वाड्रा म्हणाले. (Maharashtra News)
भारत जोडो यात्रेचा प्रभाव संपूर्ण देशात दिसून येईल. पाऊस असो किंव्हा कोणतेही वातावरणात राहुल काम करतायत. राहुल गांधी निडर व्यक्ती असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचे विचार आहेत. बेरोजगारीचा मुद्दा उचलण्यासाठी आम्हाला इडी कार्यालयात जावे लागते. कारण तिथे गेल्यावरच मीडिया आमची दखल घेते. आम्ही आमचे काम करत असून आम्हाला प्रत्येकवेळी मीडियात दिसण्याची किंवा काही लोकांसारखी प्रत्येक वेळी सेल्फी घेण्याची गरज नाही. कठीण प्रसंगीच माणूस आधिक कणखर बनतो. लोकांचा राहुल गांधींवर विश्वास वाढत असून लवकरच देशात बदल दिसेल.
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी आणि शिवसेना येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. देशात जे सुरू आहे त्या विरोधात एकत्र आलं पाहिजे. जसं महाराष्ट्रात शिवसेना फोडून सरकार पाडलं तस सगळीकडे सुरू आहे. प्रधानमंत्री जेव्हा बोलणार असतात तेव्हा जनतेला पुढे काय होणार याची काळजी वाटते. लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. राजीव गांधींचे अपुरे स्वप्न राहुल गांधी पूर्ण करणार आहेत असंही राबर्ट वाड्रा म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.