Ratan Tata The Pride Of India | रतन टाटांंबद्दल मराठमोळ्या चाहत्याचं प्रेम! ५७ भाषांमध्ये कारवर छापलं नाव

Ratan Tata The Pride Of India: रतन टाटा यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी रवी पाटोळी यांनी जगातील तब्बल ५७ भाषांमध्ये टाटांचं नाव आपल्या चारचाकीवर लिहीलं आहे.
Ratan Tata The Pride Of India
Ratan Tata The Pride Of Indiaसचिन आगरवाल

सचिन आगरवाल, अहमदनगर

Ratan Tata's Marathi Fan: टाटा हे नाव घेतले तरी आपल्या समोर उभं राहतं ते रतन टाटा यांनी भारतासाठी केलेलं औद्यागिक आणि सामजिक कार्य. रतन टाटा (Ratan Tata) यांचे कार्य हे भारत देशासाठी उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कार्यातून प्रेरित होऊन अहमदनगरचे रहिवासी रवी पाटोळे यांच्यावर टाटांचा मोठा प्रभाव पडला असू ते त्यांचे मोठे चाहते झाले आहेत. रतन टाटा यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी रवी पाटोळी यांनी जगातील तब्बल ५७ भाषांमध्ये टाटांचं नाव आपल्या चारचाकीवर लिहीलं आहे. टाटा यांचा फोटो आणि ५७ भाषांमधली ही नावं ते अभिमानाने मिरवतात. (Ahmadnagar Latest News)

Ratan Tata's Marathi Fan
Ratan Tata's Marathi Fanसचिन आगरवाल

अहमदनगरमधील (Ahmadnagar) रवी पाटोळे हे टाटा यांचे खूप मोठे चाहते आहेत. सकाळी उठल्यावर चहा टाटाचा, घरात वापरले जाणारे मीठ टाटाचे, डिश टीव्ही सुद्धा टाटाचीच. एवढंच काय तर, त्यांची गाडीसुद्धा टाटाचीच. लग्नाच्या वेळी त्यांनी त्यांच्या बायकोला फोन सुद्धा घेऊन दिला तो ही टाटा कंपनीचा होता. रवी पाटोळे या अवलियाने आपल्या टाटा गाडीवर टाटा The Pride Of India हे वाक्य जगातील 57 भाषेत त्याचे स्टिकर बनवून गाडीला चिटकवले आहेत. टाटा हे मोठं सामाजिक कार्य करतात म्हणून आम्ही त्यांचे फॅन असल्याचे पाटोळे यांच्या पत्नी सुरेखा पाटोळे यांनी सांगितले.

Ratan Tata The Pride Of India
Bharat Jodo Yatra: भारताचे तुकडे होऊ देणार नाही; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी लहानग्यांसोबत मनसोक्त धावले, पाहा Video

रवी पाटोळे यांनी पहिली गाडी घेतली तीही टाटाची आणि आताची गाडीदेखील टाटा कंपनीचीच आहे. टाटा The Pride Of India हे वाक्य रवी पाटोळे यांना सुचलं आणि त्यांनी हे वाक्य जगातल्या 57 भाषेत प्रिंट करून आपल्या गाडीला चिटकवले आहे. सध्या टाटा Airbus मुद्द्यावरून राजकारण तापले असताना रवी पाटोळे या टाटांच्या चाहत्याची आणि त्यांनी आपल्या चारचाकीवर लावलेल्या स्टिकरची चांगलीच चर्चा आहे.

Edited By - Akshay Baisane 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com