VIDEO: आणखी एक गांधी संसदेत जाणार? प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानात

Priyanka Gandhi Vadra: प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानात अतरल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे आता प्रियंका वायनाडमधून निवडणूक लडवणार आहेत. त्यामुळे तिस-या गांधी संसदेत जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
आणखी एक गांधी संसदेत जाणार? प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानात
Priyanka Gandhi Vadra to contest Wayanad bye-polls Saam Tv

चालणं...बोलणं...दिसणं...भेटणं....सारं काही आपली आजी इंदिरा गांधींसारखं....इंदिरा गांधींचंच प्रतिबिंब असलेल्या प्रियंका गांधींविषयी काँग्रेसला आणि देशातल्या जनतेला नेहमीच कुतूहल राहिलं. त्यामुळेच 2014 नंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला जेव्हा जेव्हा अपयश आलं, तेव्हा तेव्हा प्रियंका गांधींच्या राजकारणातल्या एण्ट्रीची चर्चा झाली. अखेर प्रियंका गांधींनी 2019 मध्ये अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या महासचिव झाल्या. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाचीही जबाबदारी देण्यात आली.

दिल्लीत राहणाऱ्या प्रियंका गांधी भलेही जिन्स-टीशर्टवर वावरत असल्या तरी गाव-खेड्यात प्रचार करताना आपल्या आजीसारखी खादीची साडी कधी सोडली नाही. लोकांमध्ये असताना आपल्या आजीसारखाच एक सहज भाव त्यांच्याच जाणवतो. म्हणूनच नंदुरबारसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सभेला तुफान गर्दी जमली आणि प्रियंका गांधींना पाहून लोकांनी चक्क इंदिरा इंदिराच्या घोषणा दिल्या.

आणखी एक गांधी संसदेत जाणार? प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानात
VIDEO: पराभवानंतर भाजपचा अॅक्शन प्लॅन, अडचणीतील 33 मतदारसंघांसाठी आखली नवीन रणनीती

सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या राजकारणाला निरोप देत राज्यसभेचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे पारंपरिक रायबरेली मतदारसंघात आईची जागा मुलगी घेणार असल्याची चर्चा रंगली. तर पक्षातल्या नेत्यांनी मोदींना आव्हान देण्यासाठी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.

मात्र निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहिलेल्या प्रियंकांनी प्रचारातच योगदान देणं पसंत केलं. यंदा राहुल गांधींनी वायनाड पाठोपाठ रायबरेलीतूनही निवडणूक लढवली. ते दोन्ही ठिकाणांहून जिंकून आले. त्यानंतर वायनाडची खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आणि अखेर प्रियंका गांधींना निवडणुकीच्या मैदानात यावंच लागलं.

आणखी एक गांधी संसदेत जाणार? प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानात
VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय, पाहा व्हिडिओ

प्रियंका गांधी कधी मुलगी म्हणून आपल्या आईच्या पाठिशी ठाम उभ्या राहिल्या. तर भारत जोडो यात्रा असो की भावाच्या मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा बहिण म्हणून त्या नेहमीच राहुल गांधींसोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. पडत्या काळात साथ देणाऱ्या वायनाडवासियांना राहुल गांधींची कमतरता भासायला नको म्हणून प्रियंका गांधी भावाची जागा घेण्यासाठी वायनाडच्या मैदानात उतरल्या आहेत आणि निवडणुकीच्या राजकारणातही...कारण नेहरू-गांधी घराण्यात जन्माला येणं आणि निवडणूक न लढवणं हे कसं शक्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com