Shocking: निवृत्त जवानानं बायको अन् मुलाला गोळ्या झाडून संपवलं, नंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका निवृत्त जवानाने बायको आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केली. गोळ्या झाडून त्याने दोघांना संपवलं. त्यानंतर रेल्वे रूळावर झोपून त्याने आत्महत्या केली.
Shocking: निवृत्त जवानानं बायको अन् मुलाला गोळ्या झाडून संपवलं, नंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली

  • निवृत्त जवानाने बायको अन् मुलाची गोळ्या झाडून हत्या केली

  • बायको आणि मुलाला संपवल्यानंतर त्याने आत्महत्या केली

  • रेल्वे रुळावर झोपून त्याने आत्महत्या केली

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भयंकर घटना घडली. एका निवृ्त्त जवानाने आधी बायको आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. ही घटना कानपूरच्या बखरिया गावात घडली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतराम पासवान असं आत्महत्या केलेल्या निवृत्त जवानाचे नाव होते. तो बखरिया गावामध्ये बायको सुनीता आणि मुलगा दीपसोबत राहत होता. चेतराम पासवानने घरामध्येच गोळ्या झाडून बायको आणि मुलाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर दुचाकीवरून दोन किलोमीटर अंतरावर जाऊन त्याने आत्महत्या केली. तो रेल्वे रुळावर झोपला. अंगावरून भरधाव ट्रेन गेल्यानमुळे चेतराम पासवानचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे झाले.

Shocking: निवृत्त जवानानं बायको अन् मुलाला गोळ्या झाडून संपवलं, नंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
Maharashtra Crime : उरणमध्ये खळबळ! भाजप आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन तरूण घुसला अन्...

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख चेतराम पासवान अशी झाली. पोलिसांना चेतराम पासवानच्या खिशात आधारकार्ड मिळाले त्यावरील पत्त्यावरून पोलिस त्याच्या घरी पोहचले. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला तर त्यांना आतमध्ये चेतराम पासवानची बायको आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. दोघांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. घटनास्थळावर पोलिसांना बंदूक देखील सापडली.

Shocking: निवृत्त जवानानं बायको अन् मुलाला गोळ्या झाडून संपवलं, नंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
Crime : पोलीस स्टेशनमध्ये राडा, बायको तक्रार करायला गेल्यावर पोलिसाची सटकली, मग..

पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. चेतरामने आधी बायको आणि मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील आली असून पुरावे जमा करत आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. चेतरामने हे धक्कादायक कृत्य का केले? यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Shocking: निवृत्त जवानानं बायको अन् मुलाला गोळ्या झाडून संपवलं, नंतर धावत्या ट्रेनसमोर मारली उडी
Crime : धक्कादायक! चाकूने छाती व पोटावर वार, भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com