मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Ravneet Singh Bittu Resigns Union Minister: केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो मंजूर केला आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Union Minister Ravneet Singh Bittu resigns; President Droupadi Murmu accepts resignation, triggering political reactions
Union Minister Ravneet Singh Bittu resigns; President Droupadi Murmu accepts resignation, triggering political reactionssaam tv
Published On

केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधानांच्या सल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. रवनीत सिंह बिट्टू हे मोदी सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री तसेच उद्योगमंत्री हे खात सांभाळत होते. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बेअंत सिंह यांचे नातू असून सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. रवनीत सिंह बिट्टू यांनी 2009 साली काँग्रेसच्या तिकिटावर आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजय मिळवला. त्यांनंतर 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी पंजाबमधील लुधियाना मतदारसंघातून सलग निवडून येत खसदारकीचे पद आपल्याकडे कायम ठेवले.

Union Minister Ravneet Singh Bittu resigns; President Droupadi Murmu accepts resignation, triggering political reactions
कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

2017 मध्ये त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत जलालाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना सुखबीर सिंह बादल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 2021 मध्ये त्यांनी लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली. 2024 साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची रेल्वे राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Union Minister Ravneet Singh Bittu resigns; President Droupadi Murmu accepts resignation, triggering political reactions
विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू असताना मोदी सरकारची मोठी कारवाई; नीट पेपरफुटीप्रकरणी ४७ अधिकारी बडतर्फ

रवनीत सिंह बिट्टू यांना दोन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. जानेवारी 2021 मध्ये सिंघू सीमेजवळील एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला होता. तसेच 2023 मध्ये व्हॉट्सअॅप कॉलद्वारे त्यांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी लुधियाना मतदारसंघातून अमरिंदर सिंह राजा वारिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना रेल्वे राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. त्यानंतर 2024 ते 2026 या कालावधीत ते राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com