Operation Tiger: बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना सुप्रीम कोर्टात, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला थेट आव्हान

Shivsena Thackeray group Moves Supreme Court: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. सहा बंडखोर खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला त्यांनी आव्हान दिले.
Operation Tiger: बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना सुप्रीम कोर्टात, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला थेट आव्हान
Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam Tv
Published On
  • ठाकरेसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

  • बंडखोर खासदारांचे शिंदे गटात विलीनीकरणावर आक्षेप

  • लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आव्हान

  • ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेसेनेत केला होता प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाने बंडखोर खासदारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मंजुरीला ठाकरे सेनेने कोर्टात आव्हान दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका दाखल केली. हे प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठी ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या एका मोठ्या निर्णयाला आव्हान देत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवसआधी लोकसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे गटाच्या ६ बंडखोर खासदारांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होण्यास हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. आता या निर्णयाविरोधात ठाकरेसेना कोर्टात गेली आहे. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे मत ठाकरेसेनेने मांडले आहे. कोर्टात धाव घेत ठाकरेसेनेने तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली.

Operation Tiger: बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना सुप्रीम कोर्टात, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला थेट आव्हान
Politics : उद्धव ठाकरेंना जोरदार झटका! ६ बंडखोर खासदारांच्या शिंदेसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेले वकील देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टात तातडीच्या सुनावणीची मागणी केली. कोर्टाने जेव्हा ठाकरेंच्या वकिलाला तातडीच्या सुनावणीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, 'एक राजकीय पक्ष म्हणून संसदेतील माझे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. हे खासदार माझ्यासोबत नाहीत. अध्यक्षांनी त्यांच्या दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास मंजुरी दिली आहे आणि हे या संसदीय अधिवेशनापुरतेच आहे.'

Operation Tiger: बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना सुप्रीम कोर्टात, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला थेट आव्हान
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

दरम्यान, ऑपरेशन टायगरद्वारे एथनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या ६ विश्वासू खासदारांना शिंदेंनी फोडले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच ठाकरेंना हा धक्का देण्यात आला. पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश पाटील-आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला होता.

Operation Tiger: बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना सुप्रीम कोर्टात, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला थेट आव्हान
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com