Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?

Shivsena Shinde Gpro: नवी मुंबईत शिवसेना शिंदेगटाच्या महिला नेत्याविरोधात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. व्यावसायिकाडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?
Eknath ShindeSaam tv
Published On
  • नवी मुंबई शिंदेसेना महिला नेत्याला अटक

  • पूजा बनसोडे यांना खंडणी प्रकरणात अटक

  • व्यानसिकाकडे मागितली होती खंडणी

  • तुर्भे पोलिसांची मोठी कारवाई केली

नवी मुंबईच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदेगटाच्या महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. पूजा बनसोडे असं या महिला नेत्याचे नाव असून त्या शिंदेगटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आहेत. पूजा बनसोडे यांच्यासह आणखी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे इतर ३ जण सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहेत.

नवी मुंबईतल्या तुर्भे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांनी एका भंगार व्यावसायिकाकडे २ लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यामुळे पूजा बनसोडे यांनी या व्यावसायिकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्याचसोबत धमकी देखील दिली होती.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?
Maharashtra Politics: मोठी बातमी! तटकरे- पटेलांनंतर पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तुर्भे पोलिसांनी पूजा बनसोडे आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तात्काळ पूजा बनसोडे यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर ३ आरोपी फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

पूजा बनसोडे यांनी आपल्या ३ साथीदारांसह तुर्भे परिसरात राहणाऱ्या भंगार व्यावसायिकाकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हे पैसे घेण्यासाठी हे चौघे व्यावसायिकावर दबाव टाकत होते. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पूजा बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना मारहाण केली होती. त्याचसोबत शिवीगाळ करत धमकी देखील दिली होती. या सर्व त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पूजा बनसोडेला अटक केली.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?
Politics : उद्धव ठाकरेंना जोरदार झटका! ६ बंडखोर खासदारांच्या शिंदेसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com