Parliament Session: सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या वाढवण्यापासून ते MSME सुधारणांपर्यंत...; पावसाळी अधिवेशनात सरकार ही ७ विधेयकं मंजूर करणार?

Monsoon Session 2026: संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये केंद्र सरकार पाच नवीन आणि दोन प्रलंबित विधेयकं मंजूर करण्याच्या तयारीत आहे. FCRA, आयकर, सर्वोच्च न्यायालय, MSME आणि जन्म-मृत्यू नोंदणीसह महत्त्वाच्या विधेयकांवर संसदेत चर्चा होणार आहे.
Parliament Session
Parliament Sessionsaam tv
Published On

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी केंद्र सरकारचा अजेंडा समोर आला आहे. या अधिवेशनात सरकार पाच नवीन विधेयक आणि आधीपासून प्रलंबित असलेली दोन विधेयकं मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. रविवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत या विधेयकांबाबत सर्व राजकीय पक्षांना माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे गरज पडल्यास आणखी काही विधेयकंही सरकारच्या कार्यक्रमात समाविष्ट केली जाऊ शकतात.

सरकारचं उद्दिष्ट या अधिवेशनात ही सर्व विधेयकं मंजूर करून घेण्याचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम सर्वपक्षीय बैठकीत या विषयांवर विविध पक्षांशी चर्चा केली जाणार आहे. इतर पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली तर ही विधेयकं मंजूर होणं सोपं जाईल. मात्र विरोध झाल्यास सरकारला आपली रणनीती बदलावी लागणार आहे.

सध्या तयार करण्यात आलेल्या संभाव्य विधेयकांच्या यादीत कोणत्याही संविधान दुरुस्ती विधेयकाचा समावेश नाही. यापूर्वी संसदेत मांडलेल्या विधेयकांसोबत पाच महत्त्वाची नवीन विधेयकंही सरकार आणणार आहे. त्यापैकी दोन विधेयकं आधी काढलेल्या अध्यादेशांच्या जागी कायदा म्हणून आणली जाणार आहेत.

प्रलंबित आणि विचाराधीन विधेयकं

परदेशी निधी (नियमन) दुरुस्ती विधेयक, 2026 (FCRA)

हे विधेयक 25 मार्च 2026 रोजी लोकसभेत मांडण्यात आलं होतं. या अधिवेशनात त्यावर चर्चा करून मंजुरी घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. देशात परदेशातून येणाऱ्या आर्थिक मदतीत अधिक पारदर्शकता आणणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, 2025

हे विधेयक 15 डिसेंबर 2025 रोजी संसदेत मांडण्यात आलं होतं. त्यानंतर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. समितीचा अहवाल आल्यानंतर या अधिवेशनात त्यावर पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.

Parliament Session
ISRO News : इस्रोमधील १०० शास्त्रज्ञांचे तडकाफडकी राजीनामे, गगनयान मोहिमेबाबात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

अध्यादेशांच्या जागी येणारी नवीन विधेयकं

आयकर (दुरुस्ती) विधेयक, 2026

हे विधेयक आधी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या जागी आणलं जाणार आहे. जगभरात सुरू असलेली राजकीय अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि पुरवठा साखळीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भारताचं सरकारी Sovereign Debt Market अधिक मजबूत करणं, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं आणि बाजारातील पैशांचा प्रवाह वाढवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे.

सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक, 2026

या विधेयकाद्वारे अध्यादेशाला कायद्याचं स्वरूप दिलं जाणार आहे. यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची स्वीकृत संख्या मुख्य न्यायाधीश वगळता 33 वरून 37 केली जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित खटल्यांचा निकाल अधिक वेगाने लागण्यास मदत होणार आहे.

सरकार आणणार तीन नवीन विधेयकं

जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक, 2026

1969 च्या मूळ कायद्यातील कलम 13(3) मध्ये बदल करून उशिरा जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करण्याचे नियम अधिक कडक करण्याचा सरकारचा विचार आहे. 2023 मध्येही या कायद्यात काही बदल करण्यात आले होते.

Parliament Session
Nanded News: शिक्षकाची २ मुलांसह सामूहिक आत्महत्या; व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवला, नंतर कारमध्ये बसून ती नदीत घातली

राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक, 2026

1971 च्या कायद्यात बदल करून राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि इतर राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी शिक्षेच्या तरतुदी अधिक कडक केल्या जाणार आहेत.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (दुरुस्ती) विधेयक, 2026

एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना व्यवसाय करणे अधिक सोपं व्हावं, विश्वासावर आधारित नियम लागू करावेत, उद्योगांना होणाऱ्या उशिरा मिळणाऱ्या देयकांची समस्या कमी करावी आणि राज्य सरकारांना अधिक अधिकार द्यावेत, या उद्देशाने हे विधेयक आणलं जाणार आहे.

Parliament Session
Devendra Fadanvis : ग्रामीण भागातही मिळणार अत्याधुनिक कॅन्सरचे उपचार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com