Rajya Sabha : मोठी बातमी! राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, कधी होणार मतदान? वाचा सविस्तर

Rajya Sabha elections 2026 voting date : राज्यसभा निवडणुकीसाठी १२ जागांवर १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील १०, उत्तराखंडमधील १ आणि पश्चिम बंगालमधील १ जागेचा यात समावेश आहे. मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे.
Rajya Sabha elections 2026 voting date
Rajya Sabha elections 2026 voting dateSaam TV Marathi
Published On

Uttar Pradesh Rajya Sabha election 10 seats : १२ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील १० जागांसह १२ राज्यसभा जागांसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणीही त्याच दिवशी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. राज्यसभेच्या १२ जागांपैकी १० जागा उत्तर प्रदेशातील आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक जागा उत्तराखंडमधील आहे, भाजपचे नरेश बन्सल निवृत्त होत आहेत. त्याशिवाय टीएमसी खासदार रुक्मिणी मलिक यांच्या राजीनाम्यानंतर बंगालमधील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Rajya Sabha elections 2026 voting date
रविवारपासून 'या' ६ राशींचे नशीब उजळणार; सूर्यदेवांच्या कृपेने होणार पैशांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

कोणत्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपतोय?

२५ नोव्हेंबरला राज्यसभेच्या ११ खासदारांची मुदत संपत आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपच्या ८ खासदारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह, बी. एल. वर्मा आणि नीरज शेखर यांसारख्या बड्या नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे (बसपा) एकमेव खासदार रामजी यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे.

Rajya Sabha elections 2026 voting date
Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

बंगालमध्ये पोटनिवडणूक का?

पश्चिम बंगालमध्ये एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार रुक्मिणी मलिक यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर आता पोट निवडणूक होत आहे.

Rajya Sabha elections 2026 voting date
Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

उत्तर प्रदेशात भाजपचे बहुमत आहे, त्यामुळे सर्वाधिक जागांवर भाजपचे पारडे जड मानले जात आहे. पण निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. त्याआधी होणारी ही निवडणूक लिटमस चाचणी असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या नेत्याला पुन्हा संधी दिली जाते? हरदीप पुरी यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली जाईल का? याचीही चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com