रविवारपासून 'या' ६ राशींचे नशीब उजळणार; सूर्यदेवांच्या कृपेने होणार पैशांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

zodiac signs lucky in September : २७ सप्टेंबरला सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करणार असून १० ऑक्टोबरपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे.
Sun Transit
Sun Transit
Published On

ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह लवकरच आपले नक्षत्र परिवर्तन करणार आहे. रविवारी (२७ सप्टेंबर) दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी सूर्यदेव हस्त नक्षत्रात प्रवेश करतील. सूर्यदेव या नक्षत्रात पुढील १३ दिवस म्हणजेच १० ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहतील. सूर्याच्या या महत्त्वपूर्ण नक्षत्र परिवर्तनामुळे ६ राशींच्या जातकांच्या आयुष्यात अत्यंत सकारात्मक बदल घडणार आहे.

मेष

मेष राशींच्या लोकांना या काळात सरकाऱ्यांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये असणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल. डोळ्यांशी संबंधित आजारांपासून सुटका मिळेल, तसेच समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

Sun Transit
देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. प्रशासकीय किंवा शासकीय सेवेत असलेल्यांना मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठांच्या सहकार्याने पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. राजकारणाशी जोडलेल्या लोकांचे समाजात वजन वाढेल.

कन्या

व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्पन्नात भर घालणारा ठरेल. दैनंदिन कमाईत वाढ होईल आणि सरकारी योजनांचा थेट फायदा मिळेल. नोकरीशी संबंधित रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील. वडिलांच्या सहकार्यामुळे अनेक चिंता आणि अडचणी दूर होतील.

Sun Transit
दिवाळीआधी 'गुड न्यूज'! दारूपासून कीवी आणि सफरचंद होणार स्वस्त; एका कराराने भारताला मोठा दिलासा

वृश्चिक

या काळात तुमच्या आत्मविश्वासात आणि पराक्रमात मोठी वाढ पाहायला मिळेल. वडिलांकडून किंवा त्यांच्या संपत्तीतून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

धनु

धनु राशीच्या जातकांच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा दिसून येईल. पैशांशी संबंधित रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असून, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.

मीन

मीन राशीच्या जातकांना या काळात पैतृक संपत्तीचा मोठा लाभ मिळण्याचे योग आहेत. मालमत्तेशी संबंधित जुने वाद संपतील. नोकरीमध्ये एखादी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी किंवा मोठे काम पूर्ण होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com