धक्कादायक! धावत्या कारमध्ये IT कंपनीच्या मॅनेजरवर सामूहिक बलात्कार; कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

udaipur crime news : धावत्या कारमध्ये IT कंपनीच्या मॅनेजरवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
udaipur news
udaipur Saam tv
Published On
Summary

आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर सामूहिक अत्याचार

मॅनेजरवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ

पोलिसांकडून उशिरा रात्री तिघांना अटक

राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरमध्ये धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मॅनेजरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मॅनेजरने कंपनीचा सीईओ, महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी उशिरा रात्री तिघांना अटक केली.

udaipur news
'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सुखेर भागात २० डिसेंबर रोजीच्या रात्री ही गंभीर घटना घडली. मॅनेजर रात्री उशिरा कंपनीचा सीईओ वाढदिवस आणि नववर्षाच्या पार्टीत सामील झाली होती. मॅनेजर तरुणीने या पार्टीत दारुचे अति सेवन केलं होतं. त्यानंतर मॅनेजर ही महिला एक्झिक्युटिव्ह हेडच्या कारने घरी निघाली. या कारमध्ये एक्झिक्युटिव्ह हेडसहित तिचा नवरा आणि कंपनीचा सीईओ देखील होता.

मॅनेजरला रस्त्यात देखील दारु पाजली. त्यामुळे मॅनेजर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर कारमधील आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी तिला पहाटे ५ वाजता घरी सोडलं.

udaipur news
Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

घरी आल्यानंतर काही तासांनी तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा झाल्याचे तिला आढळून आले. तिच्या काही वस्तू तिच्याजवळ नव्हत्या. तरुणीने कारच्या डॅशकॅमचा ऑडिओ-व्हिडिओ तपासले. त्यावेळी सीईओ, महिला एग्झिक्युटिव्ह हेड आणि तिच्या पतीचे कृत्य कॅमेरात रेकॉर्ड झालं होतं. त्यानंतर पीडित मॅनेजरने २३ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे.

udaipur news
भयंकर! कॉलेजमधून घरी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २ जिवलग मैत्रिणींचा करुण अंत

मध्य प्रदेशमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार

तत्पूर्वी, मध्य प्रदेशच्या सीमेजवळ सामसूम ठिकाणी आठ जणांवर एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. आरोपी आणि तिच्या दाजीसोबत सामाजिक कार्यक्रमासोबत जात होती. आरोपींनी पीडितेच्या दाजीला पळवून लावलं. त्यानंतर आठ जणांनी पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com