Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Rajasthan Political News: राजस्थानमध्ये नगरपालिका निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली. सर्वाधिक २० जागा जिंकूनही काँग्रेसला नगराध्यक्षपद गमवावे लागले. भाजपच्या उमेदवाराला लॉटरी लागली.
Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम
Rajasthan Political newsSaam Tv
Published On
  • नोहर नगरपालिकेत भाजपला फक्त २ जागा

  • काँग्रेसच्या २० जागा तरी अध्यक्षपद हुकले

  • नोहर नगरपालिका अध्यक्षपदाचा निकाल ईश्वर चिठ्ठीने

  • २०-२० मतांनंतर ईश्वर चिठ्ठीने निकाल जाहीर

  • हजान खातून टाक नोहर नगरपालिका अध्यक्ष

राजस्थानमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. नोहर येथे झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर सोमवारी एक अशी राजकीय घडामोड घडली त्यामुळे सर्वजण चकीत झाले. या निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण समीकरणच बदलून गेले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने ४० पैकी फक्त दोन प्रभागांमध्ये विजय मिळवला, तर काँग्रेसने २० जागांवर यश मिळवले. उर्वरित १८ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे नगरपालिकेच्या अध्यक्षपद काँग्रेसला जाईल असे सर्वांना वाटत होते पण उलट घडलं.

सोमवारी झालेल्या नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुमित चचन आणि भाजपचे उमेदवार हजान खातून टाक यांना प्रत्येकी २० मते मिळाली. त्यानंतर हे प्रकरण ईश्वर चिठ्ठी टाकून निकालासाठी गेले. या प्रक्रियेमध्ये अखेरीस हजान खातून टाक यांची नोहर नगर परिषद अध्यक्षपदी निवड झाली. या संपूर्ण निवडणुकीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजपने ४० पालिका प्रभागांपैकी फक्त दोन जागा जिंकल्या. असे असतानाही त्यांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला २० मते मिळाली.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम
Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाद! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हजान खातून यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून स्वतःच्या प्रभागातून विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेतले आणि अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यानंतर पडद्यामागे राजकीय डावपेच आणि वाटाघाटीला एक आठवडा गेला. सोमवारी जेव्हा नगरसेवकांनी अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान केले, तेव्हा भाजपच्या उमेदवाराला २० मते मिळाली, जी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतांइतकीच होती. हा फरक म्हणजे भाजपची दोन जागांवरून २० जागांपर्यंत झालेली वाढ ही या नोहर निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २० मते मिळाल्याने सभागृहात कोंडी झाली. नियमांनुसार यावेळी फेरमतदान घेता आले नाही. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी ईश्वर चिठ्ठी वापरण्यात आली. एका लहान मुलीला खोलीत बोलावण्यात आले. तिने एक कागदाची चिठ्ठी बाहेर काढली. त्या चिठ्ठीवर हझन खातून टाक यांचे नाव लिहिलेले होते. यासह, ६२ वर्षीय हझन खातून टाक यांना नोहर नगरपालिका समितीचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. हजान खातून टाक यांना यांना आधीपासूनच राजकीय वारसा आहे. त्यांचे दिवंगत पती मंजूर अली टाक यांनीही त्याच नगर समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. हजान खातून या राजस्थान सरकारमधील माजी राज्यमंत्री मेहरुन्निसा टाक यांच्या सासूबाई देखील आहेत.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम
Maharashtra Politics: मोठी बातमी! राहुल गांधींचा एक फोन अन् निर्णय बदलला, राहुल बोंद्रेचा भाजप प्रवेश अखेर रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com