Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Jaykumar Gore Big Statement: मंत्री जयकुमार गोरे यांनी पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केले. भाजप या निवडणुका महायुती म्हणून लढण्यास उत्सुक असली तरी गरज पडल्यास स्वबळावरही निवडणूक लढवू शकते असं ते म्हणाले.
Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Jaykumar GoreSaam Tv
Published On
  • पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६

  • जयकुमार गोरे यांनी पुणे पदवीधर शिक्षक निवडणुकीबाबत मोठं विधान केलं काय

  • पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची चर्चा

  • पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीची रणनीती

  • पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

भरत नागणे, पंढरपूर

पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप या निवडणुका महायुती म्हणून लढण्यास उत्सुक असली तरी गरज पडल्यास स्वबळावरही दोन्ही जागा जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, 'निवडणूक चिन्हावर लढायची की नाही, पार्टी म्हणून लढायची की महायुती म्हणून लढायची हा निर्णय मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात. आम्ही कार्यकर्ते म्हणून समोर येईल त्या परिस्थितीनुसार निवडणूक लढायला सज्ज आहोत.' जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या निवडणुकीत भाजप नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांची भेट; शिंदे गटात अस्वस्थता, रायगडच्या राजकारणात खळबळ

पुणे विभागात गेल्यावेळी भाजपला दोन्ही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावर भाष्य करताना गोरे म्हणाले, 'मागच्या वेळी पदवीधर आणि शिक्षक दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता हे मान्य करावं लागेल. राजकारणात फायदा-नुकसान होत असतं. पण झालेलं नुकसान भरून काढणं ही कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे.त्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदार नोंदणीवर विशेष भर दिला आहे. आम्ही यावेळी मतदार नोंदणीपासून ते सर्व तयारी मजबुतीने केली आहे.'

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

आगामी निवडणुकीत पुणे विभागातील या दोन्ही प्रतिष्ठेच्या जागा महायुती म्हणून लढल्यास विजय निश्चित असल्याचा दावा गोरे यांनी केला. त्याचवेळी, 'वेळ आली आणि पक्षाने एकटं लढायला सांगितलं तरी पक्ष दोन्ही निवडणुका ताकदीने लढायला आणि जिंकायला सज्ज आहे. असे सांगत त्यांनी स्वबळाचीही तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागात शिक्षक आणि पदवीधर मतदारांमध्ये भाजपने आतापासूनच बैठकांचा धडाका लावला असून पालकमंत्र्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com