Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांची भेट; शिंदे गटात अस्वस्थता, रायगडच्या राजकारणात खळबळ

Bharat Gogawale meets Sunil Tatkare: सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्या भेटीवरून राजकारण तापले आहे. भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतलं.
Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांची भेट; शिंदे गटात अस्वस्थता, रायगडच्या राजकारणात खळबळ
Bharat Gogawale meets Sunil TatkareSaam Tv
Published On
  • भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या घरी घेतले गणपती दर्शन

  • भरत गोगावले आणि सुनील तटकरे भेटीवरून राजकारण तापले

  • गोगावले -तटकरे भेटीवर आमदार महेंद्र दळवींची नाराजी

  • रायगडच्या राजकारणात गोगावले- तटकरे भेटीची जोरदार चर्चा

  • शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी भरत गोगावले यांच्यावर नाराज

सचिन कदम, रायगड

शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहेत. शिवसेना शिंदेगटाचे नेते महेंद्र दळवी यांनी या भेटीवरून नाराजी व्यक्त केली. दोन कट्टर विरोधकांच्या भेटीवरून रायगडमधील राजकारण तापले आहे. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंची घेतलेली ही भूमिका चुकीचं असल्याचे मत आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केले.

भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतलं. याचे फोटो मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून राजकारण तापले. भरत गोगावले यांचं सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणं शिवसैनिकांना रूचलेल दिसत नसून गोगावलेंच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अशातच आता शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली.

Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांची भेट; शिंदे गटात अस्वस्थता, रायगडच्या राजकारणात खळबळ
Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं

आमदार महेंद्र दळवी यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना भरत गोगावलेंना सूचक टोला लगावला. 'गणपतीबाप्पाचे दर्शन घेणे चुकीचं नाही परंतू आम्ही केलेला संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंनी घेतलेली ही भूमिका चुकीच असल्याचे म्हणत अशा गोष्टी गोगावलेंनी टाळाव्यात असा सल्ला महेंद्र दळवींनी गोगावले यांना दिला आहे.

Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांची भेट; शिंदे गटात अस्वस्थता, रायगडच्या राजकारणात खळबळ
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

तसंच, 'राष्ट्रवादी पक्ष म्हणून नाही तर सुनील तटकरे यांच्या वरती आमची नाराजी हे निश्चित आहे. अनेकांना सुनील तटकरे यांनी रस्त्यावर आणून सोडण्याचं काम केले आहे. तटकरे कुटुंबाविषयी आमची नाराजी आहे.', असे देखील महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महेंद्र दळवी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आता भरत गोगावले आणि सुनील तटकरे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं राहिल.

Maharashtra Politics: दोन कट्टर विरोधकांची भेट; शिंदे गटात अस्वस्थता, रायगडच्या राजकारणात खळबळ
West Bengal Politics: ममता बॅनर्जींना २४ तासांत दुसरा धक्का! उमेदवारानं ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com