

महाड नगर परिषद राडा प्रकरणात मोठी अपडेट
मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा अखेर पोलिसांसमोर शरण
विकास गोगावले महाड पोलिस ठाण्यात हजर
हायकोर्टाने जामिन अर्जावरील सुनावणीदरम्यान फटकारानंतर हालचालींना वेग
रायगडच्या महाड नगर परिषद राडा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावले फरार होता. २ डिसेंबरपासून तो फरार होता. अखेर दीड महिन्यांनंतर तो महाड पोलिसांसमोर शरण आला आहे. या प्रकरणी मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारला खडसावल्यानंतर विकास गोगावले पोलिसांसमोर शरण आला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड नगर परिषद राडा प्रकरणात विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर झाला आहे. विकास गोगावले स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला आहे. विकास गोगावलेसह महेश गोगावले, विजय मालुसरे, धनंजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ हे ८ जण पोलिसांसमोर शरण आले. त्यामुळे महाड पोलिस ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये तुफान राडा झाला होता. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.
महाड नगर परिषद राडा प्रकरणी महाड पोलिसांनी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा श्रीयांश जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्व आरोपी फरार झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. विकास गोगावलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या सुनावणीवेळ कोर्टाने राज्य सरकारसह पोलिसांनाच खडेबोल सुनावले होते. 'मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात. मंत्र्यांच्या संपर्कात असतात. पण पोलिसांना ते सापडत नाहीत. हे सगळं होऊनही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात. सरकारने मनात आणले तर कोणत्याही व्यक्तीला २४ तासांत अटक केली जाऊ शकते.' , असे कोर्टाने सांगितले होते.
दरम्यान, महाड नगर परिषद राज्याप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना विकास गोगावले आणि शिवसैनिकांची बाजू मांडली. विकास गोगावले यांची चर्चा होते मग राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार माणिक जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश महाडीक आणि कर्जत प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे देखील फरार आहेत. पण त्यांच्याबाबत चर्चा होत नसल्याचा मुद्दा घोसाळकर यांनी उपस्थित केला. भरत गोगावले यांच रायगडमधील वाढणार प्रस्त खुपत असल्याने राष्ट्रवादी विकास गोगावलेंच्या आडून मंत्री भरत गोगावलेंना बदनाम करत असल्याचा आरोप घोसाळकर यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.