Emmanuel Macron: इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पंतप्रधान मोदींनी दिली खास भेट, पाहा VIDEO

PM Modi And Emmanuel Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. २६ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे आहेत.
PM Modi  And Emmanuel Macron
PM Modi And Emmanuel Macron Saam Tv

PM Modi And Emmanuel Macron:

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. २६ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे आहेत. इमॅन्युएल गुरुवारी जयपूर विमानतळावर पोहोचले. बुलंदशहर दौऱ्यानंतर मॅक्रॉन यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये पोहोचले.

पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी जयपूरमध्ये रोड शो केला. या दोघांनी जंतरमंतरलाही भेट दिली होती. यादरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी हसत हसत मॅक्रॉन यांना खास भेट देत आहेत. गिफ्ट हातात धरून इमॅन्युएल मॅक्रॉन काही वेळ त्याकडे पाहत राहिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi  And Emmanuel Macron
Republic Day 2024: 'अमृत काळ भारताला नवीन उंचीवर नेईल', प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशाला संदेश

पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना राम मंदिराचे दिलं मॉडेल

जयपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना राम मंदिराचे मॉडेल भेट म्हणून दिले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान मोदी मॅक्रॉन यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत आणि त्यांना राम मंदिराचे मॉडेल देत आहेत. मॅक्रॉन यांनी राम मंदिराचे मॉडेल हातात घेताच ते अगदी बारकाईने बघत होते.  (Latest Marathi News)

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी जंतरमंतर ते हवा महल असा रोड शो केला. रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन एका ओपन-टॉप वाहनात उभे होते. दोन्ही नेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनसमुदायाचे अभिवादन स्वीकारले. त्याच्यावर अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

PM Modi  And Emmanuel Macron
Ajit Pawar Group: शरद पवार गटाला मोठा धक्का, आणखी एका आमदाराने अजित पवार गटाला दिला पाठिंबा

भारत दौऱ्याचा एक भाग म्हणून मॅक्रॉन गुरुवारी दुपारी जयपूरला पोहोचले. राज्यपाल कलराज मिश्रा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मॅक्रॉन यांचे विमानतळावर स्वागत केले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी संध्याकाळी जयपूरला पोहोचले. विमानतळावरून मोदी जयपूरच्या उद्यानात असलेल्या जंतरमंतरला रवाना झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com