Republic Day 2024: 'अमृत काळ भारताला नवीन उंचीवर नेईल', प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशाला संदेश

President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSaam Tv
Published On

Republic Day President Speech:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आणि उद्या देश संविधानाचा उत्सव साजरा करेल, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपती म्हणाल्या की, "संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडियाने होते. हे शब्द आपल्या राज्यघटनेचा मूळ आत्मा अधोरेखित करतात."

आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना अमृत काळच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

President Droupadi Murmu
Ajit Pawar Group: शरद पवार गटाला मोठा धक्का, आणखी एका आमदाराने अजित पवार गटाला दिला पाठिंबा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला संबोधित करताना म्हटलं की, देशातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ पूर्वीपेक्षा उच्च उद्दिष्टे साध्य करत आहेत. राष्ट्रपतींनी नारी शक्ती वंदन कायदा हा क्रांतिकारी उपक्रम असल्याचे वर्णन केले. त्या म्हणाल्या, "मला विश्वास आहे की नारी शक्ती वंदन कायदा हा महिला सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी उपक्रम ठरेल.  (Latest Marathi News)

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "भारतात लोकशाही व्यवस्था ही पाश्चात्य लोकशाहीच्या संकल्पनेपेक्षा खूप जुनी आहे. त्यामुळे भारताला लोकशाहीची जननी म्हटले जाते.'' राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "देश अमृत काळाच्या सुरुवातीच्या काळात आहे. बदलाची वेळ आली आहे. देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असेल.”

President Droupadi Murmu
TMC vs Congress: काँग्रेसच्या या नेत्यामुळे ममता बॅनर्जी यांनी घेतली टोकाची भूमिका; TMC नेत्याने स्पष्टच सांगितलं

याआधी 14व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या लोकशाहीची विशालता आणि विविधता ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या लोकशाहीच्या गौरवशाली प्रवासात निवडणूक आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक आयोगाने आतापर्यंत 17 सार्वत्रिक निवडणुका आणि 400 हून अधिक विधानसभा निवडणुका पार पाडल्या आहेत. निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाच्या विद्यमान तसेच यापूर्वीच्या चमूची प्रशंसा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com