Sachin Pilot Sara: सचिन पायलट आणि सारा यांचा घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड

Sachin Pilot Sara Abdullah Divorce: सचिन पायलट आणि सारा यांचा घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड
Sachin Pilot, Sara Abdullah Divorce
Sachin Pilot, Sara Abdullah DivorceSaam Tv

Sachin Pilot, Sara Abdullah Divorce:

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट पत्नी सारा पायलटपासून विभक्त झाले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट यांच्यात घटस्फोट झाला आहे. पायलट यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. टोंक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर दिलेल्या शपथपत्रात पायलट यांनी पत्नीच्या नावापुढे 'घटस्फोटित' असे लिहिले आहे.

सचिन पायलट यांनी जानेवारी 2004 मध्ये सारा पायलट यांच्याशी लग्न केले. सारा या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला यांची बहीण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sachin Pilot, Sara Abdullah Divorce
Jarange Patil Latest News: मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही, सरकारने उद्याच अधिवेशन बोलवावं: मनोज जरांगे पाटील

2014 दोघे विभक्त झाल्याची चर्चा

प्रतिज्ञापत्रात सचिन पायलट यांनी त्याच्या मुलांची नावेही लिहिली आहेत. यात त्यांच्या मुलाचं नाव अरण पायलट आणि विहान पायलट, असं आहे. सचिन पायलट हे त्यांच्या पत्नीसोबत नऊ वर्षांपूर्वीच विभक्त झाल्याची चर्चा आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सचिन पायलट आणि सारा या वेगळे झाल्याची चर्चा होती. पण त्यावेळी त्यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. (Latest Marathi News)

पायलट यांचं 2004 मध्ये सारा यांच्यासोबत झालं लग्न

सचिन पायलट यांनी जानेवारी 2004 मध्ये सारा पायलट यांच्याशी लग्न केले. सारा या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे. नऊ वर्षांपूर्वीही सचिन आणि सारा हे विभक्त झाल्याच्या चर्चा होत्या. पण त्यावेळी त्यांनी अफवा म्हणून फेटाळून लावले होते.

Sachin Pilot, Sara Abdullah Divorce
Drought in Maharashtra: मोठी बातमी! राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये जाहीर केला गंभीर दुष्काळ

डिसेंबर 2018 मध्ये, जेव्हा सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा सारा पायलट, दोन्ही मुलगे आणि फारुख अब्दुल्ला यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com