Jarange Patil Latest News: मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही, सरकारने उद्याच अधिवेशन बोलवावं: मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Protest Latest News: मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही, सरकारने उद्याच अधिवेशन बोलवावं: मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil Latest NewsSaam Tv
Published On

Manoj Jarange Patil Latest Press Conference:

''मंत्रिमंडळ बैठकीत जे निर्णय घेतले आहेत, ते आम्हाला मान्य नाही. प्रमाणपत्र वाटू दिले जाणार नाहीत. उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं'', असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला आहे. तसेच कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. याला मनोज जरांगे यांनी विरोध दर्शवला आहे. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं, अशी त्यांची मागणी आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Latest News
Raj Thackeray News: जीव पणाला लावू नका, उपोषण सोडा; राज ठाकरेंचं जरांगेंना आवाहन

'तर पाणी घेणार नाही'

जरांगे पाटील म्हणाले, ''आज रात्री किंवा उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही, तर पाणी घेणार नाही. सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही. बीड जिल्ह्यात संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं मत नाही, परंतु गोरगरिबांच्या लेकरांना हटवणे, आंदोलन न करू देने, हे प्रकार पोलीस करतायत.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''अगोदर आमचे आंदोलन आहे, संचारबंदी नंतर आहे. जर असे केले तर मी स्वतः एसपी कलेक्टर यांच्या ऑफिसमध्ये बसेन. संचारबंदी राबवा, पण महाराष्ट्र लोकांना त्रास झाला तर, सरकारसह संबंधित यंत्रेला सांगतो, तुम्ही आम्हाला त्रास देत असाल तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ.''

जरांगे पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात जातीयवादी अधिकारी आहेत. खोटी चर्चा करायची असेल तर मला चर्चा करायची नाही. ते म्हणाले, बीडमधील घरे कोणी जाळले? तुम्हीच जळता. भाजप यांच्यामुळे मागे पडली आहे. तुम्ही ठरवलेच आहे की महाराष्ट्र शांत राहू द्यायचं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com