Raj Thackeray News: जीव पणाला लावू नका, उपोषण सोडा; राज ठाकरेंचं जरांगेंना आवाहन

Raj Thackeray on Manoj Jarange Patil: जीव पणाला लावू नका, उपोषण सोडा; राज ठाकरेंचं जरांगेंना आवाहन
Raj Thackeray on Manoj Jarange Patil
Raj Thackeray on Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

Raj Thackeray Called Manoj Jarange Patil:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची तब्यत खूपच खालावली आहे. त्यांना हातात मायकही धरता येत नाहीय. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत हे आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, खोटारड्या आणि बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही. म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं, अशी विनंती त्यांनी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raj Thackeray on Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फडणवीसांना फोन; काय झाली चर्चा?

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले?

राज ठाकरे ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही. म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.'' (Latest Marathi News)

ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ''तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली या गोष्टींनी यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.''

Raj Thackeray on Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळात दुही; भुजबळ आणि मराठा नेत्यांमध्ये खडाजंगी?

त्यांनी पुढे लिहिलं की, ''यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत. हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच.या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश - बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही, याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com