राजस्थानच्या बारां जिल्हयात कवाई-अटरु राज्य महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिल्याने डॉक्टर दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. कवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात डॉ.सुरेश गजराज (38), त्यांच्या पत्नी डॉ.शालिनी मौर्य (35), 12 वर्षांचा मुलगा स्वप्नील आणि 7 वर्षांची मुलगी निलिशा यांचा मृत्यू झाला. हे कुटुंब मूळचे झुंझूनू जिल्ह्यातील सुरजगड येथील असून सध्या जयपूरमध्ये राहत होते. ते कारने छबरा येथे जात असताना हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिलीआणि कारमध्ये अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारचा ढिगारा हटवून चारही मृतदेह अटरू उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना माहिती दिली असून, त्यांच्या आगमनानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, अपघाताचा तपास सुरू असून फरार ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.