Buldhana Accident: बोलेरोची दुचाकीला भयंकर धडक, बापाच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू, बायकोने प्राण सोडले; बुलढाण्यात हळहळ

Bolero bike accident in Buldhana : बुलढाण्यात लाडनापूरजवळ भरधाव बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने मायलेकाचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला मारहाण करत रुग्णवाहिकाही उलटवल्याने तणाव निर्माण झाला.
Buldhana Accident:
Buldhana Accident:
Published On

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

mother and son killed in Buldhana accident : जळगाव जामोद-अकोट मार्गावर लाडनापूर गावाजवळ भरधाव बोलेरो जीपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने मध्य प्रदेश शासनाच्या बोलेरो जीपला आग लावण्याचा प्रयत्न केला. तसेच बोलेरो चालकालाही जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात होते. मात्र, यादरम्यान जमाव अधिक आक्रमक झाला. त्यांनी जखमी चालकाला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच उलटवल्याची धक्कादायक घटना घडली.

Buldhana Accident:
Accident News : भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर लाडनापूर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे. दरम्यान, अपघातातील मृत व जखमींची अधिकृत ओळख पटवण्याचे काम सुरू असून, दुर्घटनेचे नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होईल. सध्या परिसरातील परिस्थितीवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.

Buldhana Accident:
काळीज पिळवटून टाकणारी बातमी! कीर्तन करणाऱ्या भाविकांना कारने चिरडले, ५ जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा

बुलढाण्यात भीषण अपघात! एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर धडक

पुणे-नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या दुर्घटनेत टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सुमारे १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या तब्बल दीड किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या.

गेल्या दोन तासांपासून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या बससह अनेक वाहने अडकून पडली आहेत. अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com