काळीज पिळवटून टाकणारी बातमी! कीर्तन करणाऱ्या भाविकांना कारने चिरडले, ५ जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा

Supaul accident today : बिहारच्या सुपौलमध्ये NH-327E महामार्गावर कीर्तन करणाऱ्या भाविकांना कारने चिरडले. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Bihar Road Accident
Bihar Road Accident
Published On

Bihar Supaul Bihar car accident five killed : बिहारमधील सुपौल येथील NH-327E महामार्गावर एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. कीर्तन करणाऱ्या भाविकांना कारने चिरडले. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी रात्री बजरंगबली मंदिराच्या जवळ रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करणाऱ्या सहा जणांना कारने चिरडले. यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. धडक इतकी जोरदार होती की कार ५० मीटर पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली. टिलो दास (६५), राजो दास (५०) आणि सुरेंद्र यादव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक जमा झाले.

Bihar Road Accident
मोठी बातमी! काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, आमदारासह एसीपी, डीसीपी घटनास्थळावर, राज्यात खळबळ

पाच जणांच्या मृत्यूची बातमी मिळताच मृतांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कुटुंबीय संतप्त झाले होते आणि त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Bihar Road Accident
Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच, पिपरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी ताब्यात घेतली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता आणि गाडीवरील नियंत्रण का सुटले? हे पोलीस निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Bihar Road Accident
MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

सुपौलचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. प्रशासन बाधित कुटुंबांना आवश्यक ती मदत पुरवत असून, पुढील कार्यवाहीही करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com