Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

suryapet accident today Death Toll : तेलंगणातील सूर्यापेटजवळ हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसने ट्रकला धडक दिली. भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी आहेत.
Hyderabad Vijayawada highway accident Death Toll
Hyderabad Vijayawada highway accident Death Tollसाम टीव्ही मराठी
Published On

Hyderabad Vijayawada highway accident Death Toll : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर आज (बुधवारी) पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील दुर्गमपुरम स्टेजजवळ एका वेगात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसने धावत्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

पहाटेच्या सुमारास काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५:२० वाजताच्या सुमारास अपघात झाला. प्रवाशी साखरझोपत असतानाच काळाने घाला घातला. खासगी ट्रॅव्हल्स बस ४३ प्रवाशांना घेऊन हैदराबादहून विजयवाड्याच्या दिशेने जात होती. बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असतानाच दुर्गमपुरम स्टेजजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Hyderabad Vijayawada highway accident Death Toll
यवतमाळ हादरले! पहाटे ५ वाजता झोपेत असताना कानाला झाला सर्पदंश; 'मण्यार' सापाच्या विळख्याने ११ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू

स्थानिकांची आणि पोलिसांची धाव, जखमींवर उपचार सुरू

अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी जवळील स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Hyderabad Vijayawada highway accident Death Toll
MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले. मृतदेहांचा पंचनामा करून ते पोस्टमार्टमसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, नेमका अपघात चालकाला झोप आल्यामुळे झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. या भीषण घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com