संजय राठोड, यवतमाळ प्रतिनिधी
Yavatmal Snakebite : झोपेत असताना सर्पदंश झाल्याने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे ही घटना घडली असून, आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.
पहाटे सुमारे पाच वाजताच्या सुमारास आर्यन घरात झोपलेला असताना सापाने त्याच्या कानाला दंश केला. सुरुवातीला एखादा किडा चावला असावा असे वाटल्याने कुटुंबीयांच्या ही सर्पदंशाची बाब लक्षात आली नाही. मात्र, काही वेळाने आर्यनची प्रकृती खालावू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची गंभीर प्रकृती पाहता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यवतमाळ येथे उपचारादरम्यान आर्यनची प्राणज्योत मालवली. आर्यनला दंश करणारा साप हा अतिविषारी 'मण्यार' जातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आर्यन हा माणूसधरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वीमध्ये शिकत होता. त्याचा अचानक असा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने शाळा, शिक्षक आणि वर्गमित्रांवर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर हळहळ व्यक्त होत असून तुम्मावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.