MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

MPSC Drug Inspector Exam : २२ मार्चला झालेली 'औषध निरीक्षक' पदाची भरती परीक्षा आयोगाने रद्द केली आहे. परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
MPSC Drug Inspector Exam
MPSC Drug Inspector ExamSaam TV
Published On

MPSC Drug Inspector Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील 'औषध निरीक्षक' (गट-ब) पदासाठी झालेली भरती परीक्षा अखेर रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेत गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या तक्रारी आल्यानंतर, प्राथमिक चौकशीअंती आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

आयोगाने २९ जुलै २०२५ रोजी औषध निरीक्षक पदासाठी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता. चाळणी परीक्षेनंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या.

MPSC Drug Inspector Exam
Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

२२ जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या तीन, अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान, २२ मार्च रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत २२ ते २६ जुलैदरम्यान आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून ई-मेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी, २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका अथवा प्रश्न मिळाले होते आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला होता.

MPSC Drug Inspector Exam
Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

या तक्रारींचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी करून आयोगाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखण्याबरोबरच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या पदांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार असून संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख व अन्य तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com