Accident News : भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकच्या देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्यावर एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Nashik ST Bus Bike Accident: Three Killed in Deola
Nashik ST Bus Bike Accident: Three Killed in DeolaSaam Tv
Published On
Summary
  • नाशिकच्या देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्यावर भीषण अपघात

  • बस आणि दुचाकीची भीषण धडक

  • पुण्याहून सटाण्याकडे जाणाऱ्या एसटी बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक

  • दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्यावर रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सटाण्याकडे जाणारी सटाणा आगाराची एसटी बस भाबड बारी घाट उतरून येत होती. यादरम्यान बस रामेश्वर फाट्याजवळ आली असताना बसची समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही बसखाली चिरडले गेले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Nashik ST Bus Bike Accident: Three Killed in Deola
Amrut Bharat Express : प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबईतून धावणार आणखी एक अमृत भारत एक्स्प्रेस, कोणत्या स्थानकांवर थांबणार?

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आणि मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

Nashik ST Bus Bike Accident: Three Killed in Deola
Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस! पुण्यासह १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

या अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचाही तपास केला जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com