Accident : नाशिकवरून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला; मुंबईच्या ४ जणांचा मृत्यू, वाहनाचा चेंदामेंदा, ६ गंभीर जखमी

Mumbai-Nashik Highway Accident death : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील अटगावजवळ भीषण अपघात झाला. जळालेल्या ट्रकला वाहनाची धडक बसून चार जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai-Nashik Highway Atgaon Shahapur accident
Mumbai-Nashik Highway Atgaon Shahapur accidentसाम टीव्ही मराठी
Published On

फय्याज शेख, ठाणे प्रतिनिधी

Mumbai-Nashik Highway Atgaon Shahapur accident : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील अटगावजवळ भीषण अपघात झाला असून यात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनासथळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्तांना तात्काळ अपघातग्रस्तांना रूग्णालयात पाठवले. पण डॉक्टरांनी चौघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी होते. ते आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन उरकून परत येत असताना अटगावजवळ रस्त्याच्या कडेला दोन वर्षांपूर्वी जळालेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला त्यांच्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातातील ६ जखमींवर सध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींची नावे

सुभी जैस्वाल

शिवम जैस्वाल

हाशिक जैस्वाल

सुनीता जैस्वाल

राधिका जैस्वाल

सतीश जैस्वाल

संतराम जैस्वाल

मयत नावे

श्रीराम जैस्वाल

आयुष जैस्वाल

लाडो जैस्वाल

सुरज जैस्वाल

Mumbai-Nashik Highway Atgaon Shahapur accident
Tukaram Mundhe : ११ रुपयांची सलाईनची नळी अन् ३२५ रुपयांचे बिल! तुकाराम मुंढेंच्या पत्राने वैद्यकीय क्षेत्रात उडाली खळबळ

शाहपूरजवळ जालेला हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला होता. धडकेचा प्रचंड आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना आणि मृतदेहांना मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले.

Mumbai-Nashik Highway Atgaon Shahapur accident
मोठी बातमी! शिंदेसेनेच्या महिला नेत्यावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

अपघातानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. शहापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त वाहनाला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com