Rajasthan Assembly Elections: राजस्थानचं सत्ताकारण मतदानाच्या टक्केवारीवरच ठरतंय; काय आहेत गणितं, वाचा खास गोष्टी

Rajasthan Assembly Election : राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलंय. यावेळी येथील जनता नेहमीचा पॅटर्न चालू ठेवतील? का परत एकदा गहलोत सरकारला सत्तेत बसवतील, असे प्रश्न अनेकांना पडली आहेत. दरम्यान राजस्थानमधील निवडणुकांचं निकाल हा येथे झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरू ठरत असल्याचं दिसत आहे.
Rajasthan Elections
Rajasthan ElectionsSaam Tv
Published On

Rajasthan Assembly Elections 2023 :

राजस्थानमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या असून यात मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. राज्यभरात ७५.४५ टक्के मतदान झालं. मतदारांनी कोणाच्या हाती सत्ता दिली याचे उत्तर ३ डिसेंबर रोजी मिळणार आहे. राजस्थानमधील मतदारांनी विक्रमी मतदान केलं आहे. हे विक्रमी मतदान कोणत्या पक्षासाठी फायदेशीर ठरेल आणि कोणासाठी तोट्याचं ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.(Latest News)

मागील २०१८ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ७४.७१ टक्के मतदान झालं होतं. त्यात काँग्रेसच्या पक्षाला ३९.८२ टक्के मते मिळाली होती. तर भाजपला ३९.२८ टक्के मते मिळाली होती. हे आकडे पाहिले तर एकूण ०.५४ टक्क्यांच्या अंतराने भाजपचा पराभव होत काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती. तर यावेळी झालेलं मतदान हे ०.७४ टक्के अधिक झालं आहे. मतदानाचा वाढलेला आकडा पाहून भाजप आणि काँग्रेस भारावून गेले आहेत. हे वाढलेले मतदान आपल्याच खात्यात आल्याची विश्वास दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलाय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जैसलमेर जिल्ह्याच्या पोखरण विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झाल्याने अनेकांना धक्का बसलाय. येथे मागील विधानसभेच्या मतदानावेळी येथे ८७.६५ टक्के इतके मतदान झाले होते. तर यावेळी येथे ८७.७९ टक्के इतके मतदान झाले आहे. तर पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शन येथे मागील विधानसभेच्या निवडणुकीत ६०.४२ टक्के मतदान झालं होतं. तर यावेळी येथे ६१.२९ टक्के मतदान झालं आहे.

मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला ३९.२८ टक्के मते मिळाले होते. तर काँग्रेसला ३९.८२ टक्के मते मिळाली होते. यासह बसपाला ०४.०८ टक्के, सीपीएमला ०१.२३, सीपीआयला ०.१२, एनसीपी, ०.१९, इतर पक्षांना ०५.६८ आणि अपक्षांना ९.५९ टक्के मते मिळाली होती. तर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १७६ पुरूष आणि २४ महिला उमेदवार उतरले होते. यावेळी १७३ पुरुष आणि २७ महिला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Rajasthan Elections
Rajasthan Election Voting : राजस्थानमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद! 'प्रथा बदलणार, काँग्रेसचं सरकार येणार', गेहलोत यांचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com