Ajit Pawar News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र? अजित पवारांचं मोठं विधान

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv
Published On

Ajit Pawar News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. विशेष बाब म्हणजे अगदी काल-परवाच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत दिले होते. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरी ही सुनावणी चालू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'मला असं वाटतं, लोकसभेच्या बरोबर मध्यावधी विधानसभेची निवडणूक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी १९९९ साली अशा प्रकारे निवडणूक झाली होती. या काळात सहा महिने बाकी असताना निवडणुका घेतल्या आणि लोकांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र मतदान केलं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar News
Aurangabad Renaming : फक्त शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. “कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल, लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक विधान केलं होतं. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. “उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे असं वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com