Rajasthan Election: राजस्थानमधील राजकीय आखाड्यात धर्मगुरुंचा बोलबाला, निवडणुकींच्या रिंगणात धर्मगुरु उतरले, कोणाचं पारडं जड?
Rajasthan Assembly Election:
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदाही राजकीय आखाड्यात धर्मगुरू उतरले आहेत. यंदा पाच धर्मगुरु निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर चार धर्मगुरुंना भाजपने उमेदवारी दिली आहे. (Latest Marathi News)
राजस्थानसहित पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. राजस्थानच्या निवडणुकीत पाच ठिकाणी धर्मगुरू नशीब आजमावणार आहेत. यापैकी दोन धर्मगुरूंचा निवडणूक जिंकण्याचा मार्ग सोपा असल्याचं बोललं जात आहे. तर तीन धर्मगुरूंचा मार्ग कठीण असल्याचा बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सिरोही
भाजपने राजस्थानच्या सिरोही मतदारसंघातून रेबारी समाजाचे धर्मगुरू ओटाराम देवासी यांना तिकीट दिलं आहे. ओटाराम यांना सिरोही भागात भोपा या नावाने ओळखले जाते.
ओटाराम यांनी २०१३ साली भाजप सरकारच्या काळात मंत्रिपदही भूषवलं आहे. ओटाराम यांच्या विरोधात काँग्रेसने संयम लोढा यांना तिकीट दिले आहे. तर याच मतदारसंघात भाजपचा एक बंडखोर नेताही रिंगणात उतरला आहे. या मतदारसंघात ओटाराम देवासी आणि संयम लोढा यांच्यामध्ये थेट लढत असणार आहे.
तिजारा
भाजपने तिजारा मतदारसंघात खासदार बाबा बालकनाथ यांना तिकीट दिले आहे. बाबा बालकनाथ हे आधीपासूनच धुव्रीकरणाचं राजकारण करतात. तर काँग्रेसने या मतदारसंघात इमरान खान यांना तिकीट दिलं आहे. गेल्या काही निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळाली होती. तर या मतदारसंघात मेव मतांची विभागणी झाली होती.
या मतदार संघात इमरान खान एकमेव मुस्लीम उमेदवार आहे. तर एक गुर्जर समाजाचा उमेदवार हा मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. या मतदारसंघात मेव समाजाची मोठी संख्या आहे. त्यानंतर या मतदारसंघात यादव, एससी आणि गुर्जर समाजाची मोठी संख्या आहे. त्यामुळे बालकनाथ यांच्यासमोर तगडं आव्हान असणार आहे.
पोकरण
भाजपने पोकरण मतदारसंघातून महंत प्रतातपुरी यांना तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने धर्मगुरू सालेह मोहम्मद यांना तिकीट दिलं आहे. सालेह यांच्यावर सध्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
महंत प्रतापपुरी गेल्या निवडणुकीत १ हजारांहून कमी मतांनी पराभूत झाले होते. प्रतातपुरी हे राजपूत समजाचे आहेत. तर या मतदारसंघात मुसलमान, एससी-एसटी आणि राजपूत मतदारांची संख्या अधिक आहे. काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार स्थानिक नाहीत.
हवामहल
भाजपने हवामहाल या मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. बालमुकुंदाचार्य पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसने या मतदारसंघात मंत्री महेश जोशी यांच्याऐवजी आर. आर. तिवारी यांना तिकीट दिलं आहे. या मतदारसंघात ब्राह्मण आणि मुस्लिम समाजाची मोठी संख्या आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.