Petrol Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Petrol Diesel Price in Maharashtra: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. गॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Petrol Diesel Prices Today
Petrol Diesel Prices TodaySaam TV
Published On

Petrol Diesel Price in Maharashtra

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. गॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण होत आहे. कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल ७५.९५ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Petrol Diesel Prices Today
World Cup 2023 Prize: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला किती पैसे मिळाले? वाचा...

तेल कंपन्यांनी एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशातील बहुतांश शहरांमध्ये वाहनचालकांना पेट्रोल-डिझेलसाठी १०० रुपयांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहेत. पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेल ९० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नेमके कधी कमी होणार, याचीच प्रतिक्षा अनेकांना आहे. दरम्यान, कच्चा तेलाचे दर झपाट्याने कमी झाल्याने आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ, असं अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जर असं झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल स्वस्त होणार?

मागील काही दिवसांपासून देशात महागाईत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विरोधक मोदी सरकारला धारेवर धरत आहेत. त्यातच पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊन विरोधकांचा हा मुद्दा खोडून काढू शकतं, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

गेल्या २४ तासांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या दरात घसरण झाली. कच्चा तेलाच्या दरात घसरण होताच भारतीय तेल कंपन्यांनी सोमवारी इंधनाचे नवे दर जारी केले. त्यानुसार, महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर १ रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ९७ पैशांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय राजस्थान आणि झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशात पेट्रोल ३० पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी महागले आहे. उत्तराखंड, तामिळनाडू आणि गुजरातमध्येही पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ९०.०८ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Prices Today
Rashi Bhavishya: सूर्याच्या गोचरने तयार झाला त्रिग्रही योग; या राशींच्या इच्छा पूर्ण होणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com