World Cup 2023 Prize: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला किती पैसे मिळाले? वाचा...

ICC World Cup 2023 Prize Money: वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने प्रत्येक सामन्यांसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती.
Ind vs aus icc odi world cup 2023 final Prize Money team india australia cricket Team
Ind vs aus icc odi world cup 2023 final Prize Money team india australia cricket Team Saam TV
Published On

ICC World Cup 2023 Prize Money

टीम इंडिया वर्ल्डकप २०२३ फायनल जिंकून ऑस्ट्रेलियाकडून २००३ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार, अशी अपेक्षा भारतीय क्रिडाप्रेमींना होती. मात्र, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने दमदार खेळी करत टीम इंडियाला ६ विकेट्सनी पराभूत केलं. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. दरम्यान, विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ind vs aus icc odi world cup 2023 final Prize Money team india australia cricket Team
Rohit Sharma Statement: 'इथंच आमचं चुकलं..' फायनल गमावल्यानंतर निराश झालेल्या रोहितने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने प्रत्येक सामन्यांसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. याशिवाय जो संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल, त्याला बक्षिस म्हणून मोठी रक्कम दिली जाईल, असं आयसीसीने जाहीर केलं होतं. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे.

त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून ४० लाख डॉलर म्हणजेच सुमारे ३३.३३ कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे पराभवानंतरही टीम इंडियाला (Team India) बक्षिसाची चांगली रक्कम मिळाली आहे. भारताला उपविजेते म्हणून २० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १६.६५ कोटी रुपये मिळाले आहेत.

त्याचबरोबर साखळी सामन्यांमध्ये चांगला खेळ केला म्हणून दोन्ही संघांना अधिकचे पैसे मिळाले आहेत. आयसीसीने ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक विजयासाठी ३३.३१ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्याचे निश्चित केले होते. टीम इंडियाने या स्पर्धेत चांगली कामगिरी करत सलग १० सामने जिंकले होते.

त्यामुळे त्यांना ४ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ३.३३ कोटी रुपये इतकी बक्षीस रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. म्हणजेच काय तर टीम इंडियाने या विश्वचषकात एकूण २४ लाख डॉलर्स सुमारे म्हणजेच २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल झाली आहे.

विश्वचषकात कोणत्या संघाला किती पैसे मिळाले?

विश्वचषक विजेता: सुमारे ३३ कोटी रुपये (ऑस्ट्रेलिया)

विश्वचषक उपविजेता: १६.६५ कोटी (भारत)

उपांत्य फेरी- ६.६६ कोटी (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड)

ग्रुप स्टेज मधील प्रत्येक विजेत्या संघाला ३३.३१ लाख रुपये.

Ind vs aus icc odi world cup 2023 final Prize Money team india australia cricket Team
World Cup Final 2023: एक चूक अन् करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलं; इथेच टीम इंडियाने गमावली मॅच!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com