Telangana Election: ऐकलं का! महाराष्ट्रातील मतदार करणार तेलंगणा निवडणुकीत मतदान; निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू, काय आहे प्रकार?

Assembly Election : राज्यातील ३ कोटी १७ हजार मतदारांनी कोणाच्या हातात सत्ता दिली याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्राचे मतदार देखील मतदान करणार आहेत. निवडणूक तेलंगणाच्या आणि मतदार महाराष्ट्राचे असं, कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?
Telangana  Election
Telangana ElectionYandex
Published On

(संजय तुमराम)

Telangana Assembly Election maharshtra Voters :

तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडतोय. राज्यातील ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचा हा धुरळा महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलाय. इतकेच नाही तर या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार मतदानदेखील करणार आहेत. (Latest News)

तेलंगणा राज्यात विधानसभेच्या ११९ मतदारसंघात ३१ जागा राखीव असून त्यामध्ये १२ जागा एसटी आणि १९ जागा एससीसाठी राखीव आहेत. तर ८८ जागा खुल्या वर्गासाठी आहेत. विधानसभेची निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील ३ कोटी १७ हजार मतदारांनी कोणाच्या हातात सत्ता दिली याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्राचे मतदार देखील मतदान करणार आहेत. निवडणूक तेलंगणाच्या आणि मतदार महाराष्ट्राचे असं कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? नेमका काय आहे प्रकार हे आपण जाणून घेऊ.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमका काय आहे प्रकार

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरच्या महाराष्ट्राच्या हद्दीत १४ गावे आहेत. या गावांमध्येही तेलंगणा विधानसभेचा प्रचार जोरात सुरू आहे. या गावातील ३५०० मतदार तेलंगणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. या तालुक्यातील १४ गावावर महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार आपापला अधिकार सांगत आहेत. या गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आहे. येथील मतदार महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील निवडणुकीत मतदान करतात.

महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावात अधिक विकासात्मक कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा कल तेलंगणा राज्याकडे अधिक आहे. या गावांची प्रमुख मागणी होती, वन जमिनीचे पट्टे, जमिनीचे पट्टे देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले. दुसरीकडे तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत.

विधानसभा मतदानासाठी तेलंगाणा निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती,अंतापुर, इंदिरानगर, येसापुर,पलसगुडा,भोलापठार, लेंडीगुडा,अशी तेलंगाणा राज्यात मतदान करणाऱ्या गावाची नावे आहेत. येथील मतदाराची नावे दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत आहेत. दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार म्हणून घोषित केले आहे.

Telangana  Election
Telangana Election: तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, केसीआर विरोधात कोण लढवणार निवडणूक?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com