PM Modi In Tejas: PM मोदींची तेजस फायटरमधून 'गगनभरारी'; खास फोटो शेअर करत सांगितला थरारक अनुभव!

PM Narendra Modi Tejas Ride: देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेजस फायटर विमान चालवण्याचा अनुभव घेतला.
PM Narendra Modi Tejas Ride
PM Narendra Modi Tejas RideSaamtv
Published On

PM Narendra Modi In Tejas:

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेजस फायटर विमान चालवण्याचा अनुभव घेतला. या खास सफरीचा अनुभव त्यांनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाउंटवरुन शेअर केला असून या अनुभवामुळे आपल्या देशाच्या क्षमतेवरील विश्वास आणखी वाढला असल्याचे त्यांनी म्हणले आहे. या पोस्टसोबतच त्यांनी तेजस फायटरमधील खास फोटोही शेअर केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज (शनिवार, २५ नोव्हेंबर) बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला (HAL) भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याची पाहणी केली. तसेच यावेळी पंतप्रधानांनी तेजस विमानामध्ये भरारी देखील घेतली.

या खास क्षणाचा अनुभव पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे. "आपल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आपण स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.. असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कस आहे तेजस फायटर..

तेजस हे भारतीय बनावटीचे एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. हे कोणत्याही हवामानामध्ये यशस्वी उड्डाण भरू शकते. याला LiFT म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर असेही म्हटले जाते. भारतीय वायुसेनेने HAL ला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. यातील 26 तेजस मार्क-1 आतापर्यंत डिलिव्हर करण्यात आले आहेत. HAL आता याचं अपग्रेडेड व्हर्जन देखील बनवत आहे. (Latest Marathi News)

PM Narendra Modi Tejas Ride
Washim: मागणी तितका पूरवठा करा अन्यथा..., ठाकरे गटाचा कृषी व्यावसायिकांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com