Vijay Wadettiwar News: मी अजित पवारांच्या मनातलं ओळखू शकत नाही; विजय वडेट्टीवार असे का म्हणाले?

vijay wadettiwar Latest News: राजकीय वादावार बोलताना सध्या वाचाळवीरांची संख्या वाढलीय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Vijay Wadettiwar News:
Vijay Wadettiwar News: Saam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

Vijay wadettiwar on Ajit Pawar:

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी एकेरी शब्दात जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. 'सध्या वाचाळवीरांची संख्या वाढलीय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सध्याच्या राजकीय वादावार दिली. अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

विजय वडेट्टीवार यांनी आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.

वडेट्टीवार म्हणाले, 'अजित पवार यांचा रोख तसा असता तर काल छगन भुजबळ यांनी 'माझे नेते अजित पवार' असा उल्लेख केला नसता. आता त्यातून काय सूचक तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही घ्या, तर त्यांचा रोख कसा असू शकेल..कुठेतरी त्या दोघांमध्ये दरी निर्माण होते का? आणि दरी होत असेल त्यांची भूमिका वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vijay Wadettiwar News:
Chhagan Bhujbal OBC News : छगन भुजबळ OBC साठी नवा पक्ष काढण्याच्या तयारीत? आरक्षणाबाबत मांडली नेमकी भूमिका

विजय वडेट्टीवार अजित पवारांवर काय म्हणाले?

'अजित पवार दोघांनाही उद्देशून बोलले असेल. कुठल्याही परिस्थिती ओबीसी विरुद्ध मराठा होऊ नये. आरक्षणाचा विषय घेऊन पुढे गेला पाहिजे. ओबीसी विरुद्ध मराठा वाद होऊ नये, ज्याच्या त्याच्या हक्काचं संरक्षण जो तो करत असेल. पण टोकाची भूमिका घेता कामा नये अशी भूमिका काल होती आजही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'मी अजित पवारांच्या मनातलं ओळखू शकत नाही. मी त्यांच्या मनातलं सांगणं किंवा अंदाज घेणं हे चुकीचं होईल. पण कदाचित मला वाटतं त्यांचा रोख दोन्ही समाजाकडे असावा, असंही त्यांनी सांगितलं.

Vijay Wadettiwar News:
CM Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, डाॅक्टरांचा विश्रांतीचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

ओबीसी मेळाव्यावर वडेट्टीवार काय म्हणाले?

विजय वडेट्टीवार यांनी आज हिंगोलीतील होणाऱ्या ओबीसी मेळाव्यावरही भाष्य केलं. 'ओबीसी बांधवांनी मेळाव्याची तयारी केली आहे. आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी बांधवांचे फोन येत आहे. मी हिंगोली सभेला जाणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

'मला भुजबळांचा तीन-चार वेळा फोन आला. दोन्ही नेत्यांना लोक भेटले. ओबीसींच्या भावनेला छेद जाऊ नये. चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी मेळाव्याला आग्रहामुळे जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com