Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर

Lucknow loco pilot medical leave denied after surgery: मूळव्याधाच्या शस्त्रक्रियेनंतर लोको पायलटला अधिकाऱ्याने सुट्टी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या लोका पायलटने अधिकाऱ्याला पँट काढून शस्त्रक्रियेचे व्रण दाखवले.
Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर
Lucknow loco pilot medical leave denied after surgerySaam Tv
Published On

Summary -

  • लखनऊमध्ये लोको पायलटला शस्त्रक्रियेनंतर सुट्टी नाकारण्यात आली

  • निराश होऊन लोको पायलटने अधिकाऱ्याला पँट काढून जखमेचे व्रण दाखवले

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संताप

लखनऊमधील एका घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लखनऊ रेल्वे विभागात काम करणाऱ्या एका लोको पायटला मूळव्याधाच्या शस्त्रक्रियेनंतर सुट्टी नाकारण्यात आली. सुट्टी नाकारल्यामुळे निराश झालेल्या या लोको पायलटने चक्क पँट काढून अधिकाऱ्याला शस्त्रक्रिया झाल्याचे व्रण दाखवले. तरी देखील या अधिकाऱ्याने लोको पायलटची सुट्टी नाकारली. या घटनेचा व्हिडीओ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. या घटनेला अमानवीय म्हणत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने निषेध केला.

ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनच्या (एआयएलआरएसए) नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून काम करणारे राजेश मीणा यांची २२ फेब्रुवारी रोजी लखनऊ येथे मूळव्याधाची शस्त्रक्रिया झाली. त्यांना २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत रजा मंजूर करण्यात आली होती. परंतू जखम पूर्णपणे बरी न झाल्यामुळे त्यांनी विहित प्रक्रियेनुसार रेल्वे आरोग्य युनिटकडे मुदतवाढ मागितली.

Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर
Shocking : "ती नसताना मी जगून काय फायदा?" प्रेयसीचा अपघातात मृत्यू, प्रियकराने ४८ तासांत संपवलं स्वतःच जीवन

शस्त्रक्रियेनंतर झालेल्या जखमेची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लोको पायलटला रजा वाढवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या लोको पायलटने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुट्टीची मागणी केली. राजेश मीणा यांनी प्रथम क्रू कंट्रोलर आणि नंतर चीफ क्रू कंट्रोलर रतन कुमार यांच्याशी संपर्क साधला. मीणा यांनी त्यांचे शस्त्रक्रिया केलेले वैद्यकीय कागदपत्रे, लॅब रिपोर्ट आणि ड्रेसिंग्ज सादर केल्या. पण त्यांना रजा नाकारण्यात आली असा आरोप युनियनने केला आहे. शेवटी राजेश यांना त्यांच्या जखमा दाखवण्यासाठी कपडे काढावे लागले.

Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर
Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

त्यानंतर युनियन नेत्याच्या हस्तक्षेपानंतर राजेश यांना रजा देण्यात आली. एआयएलआरएसएचे सरचिटणीस के.सी. जेम्स यांनी सांगितले की, वैद्यकीय रजा मिळविण्यासाठी लोको पायलटला इतक्या टोकाला जावे लागणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी संबंधित रेल्वे प्रशासन अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.

Shocking: पँट काढली, पाइल्स ऑपरेशनचे व्रण दाखवले; तरीही सुट्टी नाकरली, रेल्वेतील धक्कादायक प्रकार समोर
Shocking: कोल्हापूर हळहळलं! पोटच्या मुलासाठी २० वर्षे सोसल्या झळा, पण क्षणात सर्व संपलं; दुधाच्या पातेल्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com