जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

Rahul Gandhi PM Modi OBC Census Separate Category Demand: ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेच्या मुद्द्याला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झालंय. त्यामुळे देशात ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेवरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी नेमकी कुणी केलीये?... नेमकं हे प्रकरण काय आहे?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Rahul Gandhi letter to PM Modi on OBC census
Rahul Gandhi letter to PM Modi on OBC censussaam tv
Published On

केंद्र सरकारकडून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झालीये. मात्र, या जनगणनेवरून राजकारण तापलंय. काँग्रेसनं सरकारच्या जणगणना प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जणगणनेसंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मोठी मागणी केलीये. एव्हंढच नव्हे तर जात जनगणनेत एससी-एसटींसारखा ओबीसींच्या गणनेसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवण्यानं राहुल गांधींनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत...

जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र श्रेणी नाही

ड्रॉप-डाउन लिस्ट नसल्याने अचूक आकडेवारी मिळण्यात अडचण येणार

बिहार आणि तेलंगणा सरकारच्या धर्तीवर यादी तयार करा

सध्याची प्रश्नावली रद्द करून नवी प्रश्नावली द्या

तर दुसरीकडे, सकल ओबीसी समाजाकडून राज्यस्तरीय ओबीसी संघटनांची बैठक मुंबईत पार पडलीये. जात जनगणनेत OBC समाजासाठी स्वतंत्र कॉलम देण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलीये. राज्यपातळीवर ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी होत होती. मात्र आता यात राहुल गांधींनी उडी घेतलीये. त्यामुळे आता हा मुद्दा देश पातळीवर पेटण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान मोदी काय उत्तर देणार? सरकार ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com