विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल; धक्कादायक कारण आलं समोर

Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwani: राहुल गांधींविरोधात उत्तराखंडमधील हल्द्वानी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जातिवाचक शब्द वापरल्याचा आरोप असून एफआयआरची मागणी करण्यात आली आहे.
Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwani
Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwanisaam tv
Published On

उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यात श्रीराम सेनेचे अमित कुमार यांनी आज विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्याविरोधात जातिवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप अमित कुमार यांनी केला असून, त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwani
‘शुद्धीकरण' ‘ही अस्पृश्यतेची मानसिकता! राहुल गांधींचा भाजप-RSSवर घणाघात; FIR दाखल करण्याची मागणी

दरम्यान, राहुल गांधी यांनी शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, शुद्धीकरण करणे हा एससी/एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्याविरोधात लवकरात लवकर एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, हल्द्वानी जिल्हा पोलिसांनी अद्याप राहुल गांधींविरोधात कोणताही एफआयआर दाखल झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या श्रीराम सेनेचे अमित कुमार यांनी दिलेल्या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हा संपूर्ण वाद काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर सुरू झाला. रॅली झालेल्या ठिकाणी श्रीराम सेनेच्या सदस्यांनी शुद्धीकरण हवन केले होते. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.

Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwani
Rahul Gandhi Today Live: 'तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नेमके काय विचार करता' हे सांगण्याची संधी देण्यासाठी आलोय : राहुल गांधी

श्रीराम सेना धर्मार्थ सेवा न्यासाचे सदस्य आणि शुद्धीकरण करणारे विनोद आर्य म्हणाले की, सनातन परंपरेचा अनुयायी म्हणून ज्या ठिकाणी भगवान श्रीरामांची पूजा केली जाते आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात. त्या ठिकाणाची स्वच्छता सुनिश्चित करणे हा माझा अधिकार आणि कर्तव्य आहे. मी स्वतः दलित समाजातून येतो. या शुद्धीकरणाच्या वेळी माझ्यासोबत दलित समाजातील इतर बांधवही उपस्थित होते.

Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwani
Rahul Gandhi: 'राहुल गांधी चर्चेपासून पळू नका...', सत्ताधारी आक्रमक, संसद परिसरात काढला मोर्चा

आर्य यांनी आरोप केला की, आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. आम्ही दलित असतानाही विरोधी पक्षनेते राहुल गांधी आमच्याविरोधात कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आम्हालाही राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करायचा आहे. आमच्या कृत्यासाठी आमच्यावर अन्यायकारक दबाव आणला जात आहे आणि आमच्या अटकेची मागणी केली जात आहे, असे आम्हाला वाटते.

Rahul Gandhi Police Complaint Over Alleged Casteist Remarks In Haldwani
Pune : "भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे" राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी पुण्यात राडा, हर्षवर्धन सपकाळ संतापले

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांनी शनिवारी 29 ऑगस्ट 2026 रोजी शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले होते की, शुद्धीकरण करणे हा गुन्हा आहे. 10 ऑगस्ट रोजी शुद्धीकरण करण्यात आले. 13 ऑगस्ट रोजी खरगे यांनी सभागृहात आपला अपमान झाल्याचे सांगितले. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. आमची मागणी आहे की, ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्याविरोधात लवकरात लवकर एफआयआर दाखल करावा. हे कृत्य एससी/एसटी कायद्याचे उल्लंघन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com