

आज मी पुण्यात आलो आहे ते तुम्हाला भाषण द्यायला नाही. किंवा मला काय वाटतं हे सांगायला नाही. किंवा राजकीय नाही. तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्याची, तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही नेमके काय विचार करता हे सांगण्याची संधी देण्यासाठी मी आलोय. मी काही कल्पना तुमच्यासमोर ठेवल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला विचार करता येईल, स्वतःला व्यक्त करता येईल.
राहुल गांधींचा झेन- जी विद्यार्थ्यांसोबत संवाद सुरू ७० कोटी महिला सर्वाधिक महत्वाच्या आहेत.
कुणी तुम्हाला विचारेल की हे कसं?
महिला भारताची सर्वात मोठी संपत्ती
महिलांना तीन चौकटीत ठेवतात.
एक तर मुलगी, बायको आणि आई म्हणून बघितलं जातं.
यात काही चुकीचं नाही. पण हीच फक्त तिची ओळख होऊ शकत नाही.
नागरिकांकडून सबसे आगे होंगे हिंदुस्तानी या गाण्यावर नृत्य
हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय च्या घोषणा
संपूर्ण वंदे मातरम् गाऊया कार्यक्रमाला गर्दी व्हायला सुरुवात
संपूर्ण वंदे मातरम् गाऊया कार्यक्रमाला ६.३० नंतर होणार सुरुवात
राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज कार्यक्रम सुरू झाल्यावर वंदे मातरम् गायन सुरू होण्याची शक्यता
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला भाजपकडून अप्रत्यक्ष उत्तर देण्याचा प्रयत्न
छात्रो की गुंज हा कार्यक्रम पुण्यातल्या एसएसपीएमएस महाविद्यालयात पार पडत असताना मोठ्या संख्येने मुली महिला आणि विद्यार्थी या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर राहुल गांधीचे आहेत ते मुलींशी संवाद साधणार आहे
यावेळी पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. हॉटेल सॅरेटोन मधून आढावा घेऊन याच कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर काँग्रेसच्या खासदार प्रणीती शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्र हे नेहमीच एक पुरोगामी राज्य राहिले आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या रक्तातच धाडस, शौर्य आणि लढाऊ वृत्ती आहे. आज राहुल गांधी पुण्यात येत आहेत आणि येथे विद्यार्थ्यांचा आवाज घुमत आहे. २० जुलै रोजी जंतरमंतर येथे झालेल्या क्रांतीनंतर आता महाराष्ट्रातील महिला आणि मुलींच्या नेतृत्वाखाली दुसरी राष्ट्रीय क्रांती तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.
जेव्हा भाजप घाबरते, त्यांना धोका वाटतो, तेव्हा ते अशाच प्रकारच्या युक्त्या अवलंबतात. संसद ही देशातील सर्वोच्च स्थान आहे, मात्र पेलेट गनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेतही उपस्थित राहिले नाहीत.
ही नौटंकी आहे. काँग्रेस पक्षाचा आलेख घसरतो आहे. आणि संपत असलेल्या काँग्रेसला जिवंत करण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन बेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपला राजकीय उद्देश्य साध्य करण्यासाठी युवकांचा उपयोग करून राहुल गांधी देशभरात अशा पद्धतीची नौटंकी करत आहे.
थोड्याच वेळात राहुल गांधी पुण्यात दाखल होणार आहेत.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर येत असून, काही वेळात त्यांचे पुणे विमानतळावर आगमन होणार आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, विमानतळ परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत.
पुण्यात आज संध्याकाळी राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासोबतच ‘संपूर्ण वंदे मातरम् गाऊया, राष्ट्रभक्तीचा जागर करूया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वंदे मातरम् गौरव कृती समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपूर्ण वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन होणार असून, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
आपले प्रश्न मांडण्यासाठी मुली येत असताना त्यांच्यावर दमबाजी किंवा धक्काबुक्की केली जात असेल, तर त्याचा आम्ही निश्चितच विरोध करू. भाजपकडून होणाऱ्या आरोपांकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या कॅमेऱ्यात काय चित्रण झाले आहे, ते पाहा. सरकारच्या दबावामुळे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप करत थोरात म्हणाले की, ज्यांना त्रास झाला त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत, मात्र गुंड मोकाट फिरत आहेत. या प्रकरणात संबंधित गुंडांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील. हे सगळे गुंड भाजपचे कसे होत आहेत, हेही तपासले पाहिजे
राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे
काल रात्री जी घटना घडली ती दुर्दैवी आहे
विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो प्रचंड गोंधळ होता मला जी गोष्ट कळली विद्यार्थी भगिनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तिच्यावर दबाव तंत्र टाकण्यात आले तिला दहशतीखाली ठेवण्यात आले
सत्ताधारी पक्षाने काही लोक त्या ठिकाणी पाठवले
लोकसभेच्या विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या संवादाला भाजप का घाबरत आहे
कालच्या राड्याला कोणीच घाबरत नाही
2014 पासून दादागिरी हुकूमशाही सुरु आहे
भाजपने काय करायचं ते करावं हा देश आपल्या सर्वांचा आहे देशाचं रक्षण करणं आपलं काम आहे
विद्यार्थी मोठ्या संख्येने येतील तुम्ही काही करत रहा
आम्हाला गुन्ह्यांची सवय झाली आहे आणि त्यालाही घाबरत नाही जे गुन्हे लावायचे आहेत ते गुन्हे लावा
आमचा नेता करारी आहे तो आमच्यात आला आहे
मुलगी सुरक्षित असावी असं आमची काळजी होती त्यामुळे आम्ही पोलीस संरक्षण मागितलं होतं
काँग्रेस लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल काय आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे
जब जब मोदी डरता है पोलीस को आगे करता है...जब जब फडणवीस डरता है पोलीस को आगे करता है हे कमकुवत असण्याची चिन्ह आहे
महिलांवर अत्याचार करणे हे बीजेपीचा पॅटर्न आहे
विकृत भाजपची ही मानसिकता आहे घाबरतात तेव्हा अशा प्रकारे काहीतरी करतात
हम झुकने वाले नहीं है
महाराष्ट्रातल्या लेकी धाडस आहे
पहिली कांती जंतरमंतरवर गल्ली दुसरी क्रांती महाराष्ट्राच्या लेखी घडवतील
काल रात्रीचा आम्ही विषय बाजूला ठेवला आहे
आज आम्ही मुलींच्या स्वागतासाठी तयार आहोत
राज्यातून मुलींचा चांगला प्रतिसाद आहे अनेक मुली या कार्यक्रमाला येतील
तक्रार दिलेले आहे गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत आम्ही यावर चर्चा उद्या करू
महाराष्ट्रातील मुलींना आव्हान आहे शांतत कार्यक्रम होणार आहे
पोलिसांची भूमिका दुटप्पीपणाची
आजचा कार्यक्रम यशस्वी होणार
खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
दगड फेकत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावे दाखल नाहीत गुन्हा दाखल आहे
जर कुणी आमच्या कार्यकर्त्यांनी काही केले असेल पैसे देणे आणि घेणे तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्यासह नेते आणि शहर पदाधिकारी राहुल गांधी यांना घेण्यासाठी विमानतळावर जातील
राहुल गांधी पुण्यातील एस एस पी एम एस परिसरात असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला ही अभिवादन करणार..
राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम होऊ नये हा भाजपचा प्रयत्न आहे
मुलीचे केस ओढले जातात आणि आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होतायत
मोदी सरकार विरोधात जेन झी मैदानात आले
महाराष्ट्रात असा अत्याचार सहन केला जाणार नाही चिंगारी पोहचली तर फडणवीस सरकार यांना भोगावे लागेल
खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
गुन्हे काँग्रेसवर दाखल झाला, अभाविप गुंडगिरी करते
राहुल गांधींना मोदी, शाह, अभाविप मानत नसलं तरी भविष्यात विरोधात बसावे लागणार आहे
राहुल गांधी यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा कोणी बोलत असेल तर तो दहशतवाद आहे
पुण्यात आज राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाला जाणाऱ्या लोकांसाठी क्यूआर कोड दिला गेला आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर एक फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॉक्स ऑफिस वरून बँड घ्यायचा आहे आणि त्यानंतरच कार्यक्रमाच्या स्थळी इच्छुकांना प्रवेश दिला जाईल.
पुणे शहरात राहुल गांधींच्या स्वागतासाठी शहरभर पोस्टर आणि फ्लेक्स
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांसाठी प्रत्येक पोस्टर वर क्यू आर कोड
पुण्यातील ठिकठिकाणच्या प्रमुख रस्त्यांवर राहुल गांधीचे पोस्टर
कार्यक्रम ठिकाणी आयोजकांकडून "डिस्क्लेमर"
कार्यक्रमस्थळी येताना फोटो आय डी सोबत ठेवणे बंधनकारक
रजिस्ट्रेशन केल्यानंतर कार्यक्रम पाहायला येणाऱ्याला बँड दिला जाणार
कार्यक्रमावेळी हा बँड हातात घालून ठेवणे अनिवार्य
रजिस्ट्रेशन केल्यानंतर सिक्युरिटी चेक केलं जाणार आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश दिला जाणार
स्टेज वर फक्त राहुल गांधी उभे असणार
भव्य दिव्य स्टेज वर विद्युत रोषणाई
सुरक्षेच्या कारणास्तव "डी" देखील आखला गेला आहे
मुख्य कार्यक्रमापूर्वी म्युझिकल बँड सादर होणार
पुण्यातील एस एस पी एम मैदानावर राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे आयोजन
संध्याकाळी ६ वाजता राहुल गांधी साधणार महिलांशी संवाद
मुख्य स्टेज वर फक्त राहुल गांधी असणार
काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
पुण्यातील छात्रों की गुंज या कर्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.