देशातून सरकारला हटवण्याची वेळ आलीय; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी सांगितला पुढचा प्लॅन

Rahul Gandhi Statement After Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं कौतुक करत पंतप्रधानांनी माफी मागावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी.
Rahul Gandhi addressing public after Dharmendra Pradhan’s resignation, supporting student protests
Rahul Gandhi addressing public after Dharmendra Pradhan’s resignation, supporting student protestssaam tv
Published On

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे देशाच्या शिक्षण व्यवस्थेला नवे रूप देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ट्विट करत म्हटले की, लोकशाही, संविधान आणि आपले भविष्य वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून ठामपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि तरुणाचा देशवासीयांना सार्थ अभिमान आहे.

Rahul Gandhi addressing public after Dharmendra Pradhan’s resignation, supporting student protests
Jagannath Rath Yatra : जग्गनाथपुरी यात्रा चेंगराचेंगरीने घेतला आणखी १ बळी, मृतांची संख्या ४ वर; १०० हून अधिक भाविक रूग्णालयात दाखल

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करतानाच त्यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या अद्याप बाकी असल्याचे स्पष्ट केले

1. पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थी आणि त्यांच्या भविष्याचा आदर करून माफी मागावी.

2. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई व्हावी.

सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, शेतकरी, मजूर आणि गरीब वर्ग ज्यांना या सरकारने चिरडण्याचे काम केले आहे, त्यांनी आपल्या स्वाभिमानासाठी घटनात्मक मार्गाने ठामपणे उभे राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, लाखों विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केल्यानंतर आता मध्यरात्री 'रील्स' (Reels) बनवून त्यांचा वेळ वाया घालवू नका. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी दोषींवर कारवाई आणि पंतप्रधानांनी माफी मागवी यापेक्षा दुसरे काहीही स्वीकारले जाणार नाही. या देशातून हे सरकार हटवण्याची वेळ आता आली आहे, असा इशारा देत त्यांनी शेवटी घाबरू नका! असे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com