.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा विरोधकांकडून निषेध
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला
जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत चर्चा नाही
राजीनामा नाही तोपर्यंत लोकसभा-राज्यसभेत चर्चा होऊन देणार नाही
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विद्यार्थी आणि विरोधी पक्षाने नीट पेपर फुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या घटनेचे पडसाद संसदेत देखील उमटत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावरून विरोधक आक्रमक झाले आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करण्यात येत आहे. अशामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला थेट इशारा दिला. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत चर्चा होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जंतरमंतरवर झालेल्या लाठीचार्जबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. तसेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. त्याशिवाय संसदेत आणि बाहेरही कोणतीही चर्चा होणार नाही, अशा स्पष्ट शब्दात विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून संसेदेबाहेर आंदोलन करण्यात आले. राजीनामा दिल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.